जीवनाच्या प्रत्येक समस्यांवेळी मार्गदर्शन करणारे व योग्य कला शिकवणारे गुरू असतात – श्री.रॉबर्ट

समीर वर्ल्ड स्कूलमध्ये अभिनव उपक्रमाने गुरुपूजनाने गुरुपौर्णिमा साजरी!

बारामती(वार्ताहर): जीवनाच्या प्रत्येक समस्यांमध्ये मार्ग दाखवून योग्य मार्गदर्शन करणारे व जीवन जगण्याची योग्य कला शिकवणारे महानायक म्हणजेच गुरु असतात असे प्रतिपादन समीर वर्ल्ड स्कूलचे प्रिन्सिपल श्री.रॉबर्ट यांनी केले.

दरवर्षीप्रमाणे याही वर्षी समीर वर्ल्ड स्कूलमध्ये गुरूपौर्णिमा मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली. यावेळी सर्व शिक्षक – शिक्षिका यांचे श्रीफळ व गुलाब पुष्प देवून विद्यार्थ्यांनी पूजन केले व आशीर्वाद घेतले.

पुढे श्री.रॉबर्ट म्हणाले की, आपल्या जीवनात गुरूंचे नानाविध रूपे आपणास पहावयास मिळतात. मूल गर्भात असल्यापासून आई त्याच्यावर उत्तम संस्कार करते. आई आपली पहिली गुरु असते. निसर्गातील प्रत्येक कण आपला गुरु असतो, कारण निसर्गा कडून खूप चांगल्या गोष्टी आपल्याला सदैव शिकायला मिळतात. जसे पाणी, झाडे, वेली, पाने, फुले, पशू, पक्षी, समुद्र, नदी, त्याचबरोबर पुस्तके या शिवाय आपले नातलग, मित्र मैत्रिणी हे सुद्धा आपले गुरूच असतात. जे जे लोक आपल्याला जगण्यासाठी नेहमी चांगले संस्कार देतात, ते आपले गुरूच आहेत. गुरु ला वयाचे, जातीचे बंधन नसते. आताचा काळ बदललेला आहे. शिक्षण पद्धती बदललेली आहे. गुरु आणि शिष्य यांचे नाते मात्र बदललेले नाही. ते आजही पवित्र मानले जाते. आजपर्यंत जगात ज्या थोर व्यक्ती होऊन गेल्या त्यांच्यावर त्यांच्या गुरूंचाच अमित प्रभाव होता. आपल्या गुरूंचा ही आपल्यावर खूप प्रभाव असतो असेही ते म्हणाले.

यावेळी सौ.रॉबर्ट मॅडम यांनी आपल्या मनोगतात गुरुपौर्णिमा या दिवसाचे महत्व विशद केले. या कार्यक्रमास स्कूलचे चेअरमन अशपाक सय्यद व प्रिन्सिपल श्री.रॉबर्ट व सौ.रॉबर्ट मॅडम, शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी यांचे मोलाचे सहकार्य लाभले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Don`t copy text!