अशोक घोडके यांजकडून…
इंदापूर(प्रतिनिधी): वर्षांनो वर्ष परंपरा असलेल्या चिखली येथील मरीमाता यात्रा महोत्सवाला सुरुवात झाली असून, आमदार यशवंत माने यांनी भेट देवून देवीचे दर्शन घेतले व भाविक भक्तांना यात्रेच्या शुभेच्छा दिल्या.

मोहोळ तालुक्यातील चिखली हे मरीमातेचे जागृत देवस्थान आहे. मातेचा यात्रा महोत्सव मोठ्या थाटामाटात साजरा केला जातो. दरवर्षी प्रमाणे मातेची शोभायात्रा काढण्यात येतेय. मातेच्या दर्शनासाठी परिसरातील नव्हे तर संपूर्ण जिल्ह्यातील भाविक दर्शनासाठी येत असतात. यात्रेला भाविकांसाठी ठीक ठिकाणी महाप्रसादाचे आयोजन केले जाते. कोरोनामुळे मागील दोन वर्षांपासून यात्रा बंद होती. मात्र यंदा कोरोनाचा प्रादुर्भाव कमी झाल्यानं भाविकांमध्ये उत्साह पाहायला मिळत आहे.
यावेळी आममदार यशवंत माने यांच्या समवेत पं.स.सदस्य अजिंक्यराणा पाटील, सोलापूर दुध संघाचे व्हा.चेअरमन दीपक माळी, उद्योजक वैभव बापू गुंड, रामदास चवरे, जयवंत गुंड, संतोष मते, श्रीकांत शेंबडे, बंडू डिकरे, जयवंत गुंड, संतोष मते, गणेश पाटील, पांडुरंग माळी, अभिषेक मते आदींसह चिखलीकर ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.