बारामती(वार्ताहर): येथील पोस्ट ऑफिस बारामती विभागातर्फे 1 जुलै ते 15 ऑगस्ट 2022 पर्यंत फक्त रू.399 मध्ये 10 लाख रूपयांचा अपघाती विमा योजना लागू करण्यात आली आहे.
यामध्ये अपघाती मृत्यू झाल्यास 10 लाख रूपये, कायमस्वरूपी संपूर्ण अपंगत्व, कायमचे आंशिक अपंगत्व, अपघाती शरीराचा भाग गमावला, अपघाताने पॅरालीसीस यापैकी कोणतेही अपंगत्व आल्यास 10 लाख रूपये मिळणार आहेत. दावाखाना खर्च (आयपीडी) 60 हजार, दवाखाना खर्च (ओपीडी) 30 हजार, मुलांच्या शिक्षण खर्च-1 लाख (जास्तीत जास्त 2 मुलांना), ऍडमिट असेपर्यंत दररोज 1 हजार, कुटुंबाला दवाखाना प्रवास खर्च 25 हजार, वेटींग पीरीयड नाही, विमाधारकाला अपघाती मृत्यू झाल्यास रू.5 हजार अंत्यसंस्कार खर्चासाठी मिळणार आहेत.
या योजनेत सहभागी होण्यासाठी वय वर्षे 18 ते 65 वर्षापर्यंत सर्वांना एकदाच 399 रूपये वार्षिक हप्ता देणेचा आहे.
यामध्ये सर्व प्रकारचे अपघात सर्पदंश, विजेचा शॉक, फरशीवरून घसरून पडणे, गाडीवरील अपघात असे सर्व अपघात यात कव्हर होतात.
ओपीडी आणि आयपीडी हे कॅशलेस नाही. हॉस्पीटलमधून डिस्चार्ज झाल्यानंतरच सर्व वैद्यकीय अहवाल सबमिट करून दावा प्रतिपूर्ती (ठशळार्लीीीशाशपीं उश्ररळा) करावा लागेल हे विमा धारकांनी लक्षात ठेवणे गरजेचे आहे.