इलेक्ट्रॉनिक सोशल मिडीयाद्वारे अचारसंहितेचा भंग? या प्रकारावर नियंत्रण कोण ठेवणार?

बारामती(वार्ताहर): निवडणूक आयोगाद्वारे निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर झाल्याच्या दिवशी म्हणजे त्याच मध्यरात्री बारा वाजल्यापासून आदर्श आचारसंहिता अंमलात येत असते ती निवडणकीची प्रक्रिया पूर्ण होईपर्यंत म्हणजे निकाल जाहीर होईपर्यंत चालू असते.

जशी निवडणूक जाहीर झाली तेव्हापासून इलेक्ट्रॉनिक सोशल मिडीयावर नेत्यांचे फोटो असलेले बॅनर, फोटो प्रसिद्ध केले जात आहेत. हा आचारंसहितचा भंग नव्हे का? किंवा यावर कोण नियंत्रण ठेवणार हे सर्वसामान्य मतदारांना कळणे आवश्यक आहे.
स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणूका निपक्षपाती, निर्भय वातावरणात व मुक्तपणे पार पाडल्या जाव्यात तसेच सत्ताधारी पक्षाच्या व सत्तेत नसलेल्या पक्षाचे उमेदवार यांना समान पातळीवर वाव मिळावा या हेतूने अस्तित्वात असलेल्या विविध कायद्यांमधील तरतुदींचे अनुषंगाने राज्य निवडणूक आयोगाने जारी केलेल्या सूचनांचा संच म्हणजे आदर्श आचार संहिता म्हणता येईल. ही अचार संहिता राजकीय लोकांबरोबर सामान्य नागरीक व मतदारांनी सुद्धा पालन करणे अपेक्षित असल्याचे राज्य निवडणूक आयोगाचे म्हणणे आहे.

आचारसंहिता कालावधीत प्रसार माध्यमांनी कोणतेही साहित्य प्रचार व प्रसार करताना जिल्हाधिकारी कार्यालयात गठीत केलेल्या समितीकडून सदर साहित्य तपासून प्रमाणपत्र घेणे आवश्यक राहील. काही ठिकाणी उमेदवार स्वत:च्या चित्रासोबत मंत्री महोदयांची चित्रे असलेले पोस्ट सोशल मिडीयावर टाकीत आहेत. काही इच्छुक उमेदवार स्वत:च्या चित्रासोबत मंत्री महोदयांचे व देव देवतांची चित्रे असलेल्या डायर्‍या, कॅलेंडर व स्टीकर छापण्याच्या तयारी आहेत पण त्यांना माहिती नसावे हे कृत्य भारतीय दंड संहितेच्या कलम 171-ड अन्वये लाच देण्याच्या सदरात मोडते.

धार्मिक स्थळांचा वापर टाळला गेला पाहिजे. कॉर्नर बैठका, सभेसाठी संबंधित पोलीस स्टेशनची परवानगी घेतली पाहिजे. इ. विषयांंबाबत बारामती नगरपरिषदेचे निवडणूक निर्णय अधिकारी यांनी मतदारांमध्ये जनजागृती होणेसाठी स्वत:हून पुढाकार घेऊन चौका-चौकात याबाबत जनजागृती करावी अशी मागणी होत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Don`t copy text!