बारामतीचे अनिल मोरे व अजय लोंढे पँथर गौरव पुरस्काराने सन्मानीत

बारामती(वार्ताहर): समाजातील नाहिरे वर्गासाठी शेवटच्या घटकापर्यंत संविधानाने दिलेले हक्क व अधिकार पोहचवण्याचे काम शासन, प्रशासन, पोलीस प्रशासन दरबारी सातत्याने संघर्ष मोर्चा, आंदोलने, धरणे आंदोलनाच्या माध्यमातून समस्या मांडून पाठपुरावा करून न्याय मिळवून देणारे बारामतीचे धडाडीचे ज्येष्ठ समाजसेवक अनिल संभाजी मोरे व अजय हनुमंत लोंढे यांना पँथर गौरव पुरस्काराने सन्मानीत करण्यात आले.

दलित चळवळीत सुवर्णपान ठरलेल्या दलित पॅन्थरचा 50वा वर्धापन दिन अर्थात सुवर्ण मोहोत्सवाचे औचित्य साधुन रिपब्लिकन युवा मोर्चा महाराष्ट्र प्रदेश यांचे वतीने राहुल डंबाळे व सुवर्णा डंबाळे यांचे मार्गदर्शनाखाली पुणे येथील सावित्रीबाई फुले सांस्कृतिक सभागृहात दलित पॅन्थर: मुक्त संवाद व सन्मानाचे आयोजन करण्यात आले होते. याप्रसंगी मोरे व लोंढे यांना पुरस्काराने गौरविण्यात आले.

महाराष्ट्र व देशातील दलित पँथर कार्याच्या आढाव्याला पन्नास वर्षे पुर्ण होत असल्याने राजकीय, सामाजिक विविध अंगी वळणावर पँथरची नेहमीच पुर्वीपासून आजआखेर छाप राहिलेली आहे. पँथरचा दरारा आजही तसाच आधोरेखीत होताना इतिहासाची धाडसी पाने सहजपणे पालटली जातात.

मोरे व लोंढे हे आपल्या दैनंदिन जीवनात विविध राजकीय सामाजिक क्षेत्रात रिपब्लिकन युवा मोर्चा व बहुजन आंबेडकरी चळवळीतील इतर समविचारी संघटना कार्यकर्ते यांचेशी समन्वय ठेवत गेली अनेक वर्षांपासून पिडीतांना न्याय देण्याचे काम आजही सातत्याने सुरु ठेवून भरिव योगदान देत आहेत. विविध प्रसंगी या दोघांना अडचणींना सामोरे जावे लागले. त्यांच्या ह्या प्रेरणादायी जीवनप्रवासात त्यांचा कार्याची विशेष दखल घेत यथोचित सन्मान, गौरव व्हावा म्हणून महाराष्ट्रातील रिपब्लिकन लोकनेते राहुल डंबाळे यांचे नेतृत्वाखाली पुरस्कार प्रदान करण्यात आला. सन्मान चिन्ह, मानपत्र, शॉल व पुष्पगुच्छ असे पुरस्काराचे स्वरुप होते.

या कार्यक्रमास अ. भा. मराठी साहीत्य संमेलनाचे मा.अध्यक्ष डॉ.लक्ष्मीकांत देशमुख, जेष्ठ पँथर नेते तानसेनभाई ननावरे, रोहीदास गायकवाड, माजी गृहराज्यमंत्री रमेश बागवे, उद्योजक व विचारवंत अविचल धिवार, सौ सुवर्णा डंबाळे, रूग्ण हक्क परिषदेचे उमेश चव्हाण, फुशाआं विचार मंचाचे विठ्ठल गायकवाड, ऍड. संदिप बनसोडे, संतोष शिंदे, सौ.मंगल अनिल मोरे इ. मान्यवर उपस्थित होते.

उपस्थित मान्यवरांनी पँथरचा काळ, पँथर कसे होते. दरारा कसा होता याबाबत अनेक घटनांच्या माध्यमांचे दाखले देत पँथरचा इतिहास विशद केला. चळवळी बद्दल अत्यंत महत्वपुर्ण विचार मांडले.

कार्यक्रमाची रुपरेषा व आभार रमाईपुत्र विठ्ठल गायकवाड यांनी मानले.बारामती, पुणे शहर व ग्रामीण, मुंबई,नाशिक, व महाराष्ट्राच्या कानाकोपर्‍यातून विविध मान्यवर व आंबेडकरी चळवळीचे कार्यकर्ते उपस्थित होते.

परदेशातील मानवतावादी, परिवर्तनवादी चळवळीतील कार्यकर्ते, समाजशास्त्राचे विद्यार्थी, अभ्यासक यांचा पँथर चळवळ ही अभ्यासाचा विषय ठरली आहे. भारतातील सामाजिक बदलांच्या लढयाचा इतिहास दलित पँथरच्या उल्लेखाशिवाय पूर्णच होऊ शकणार नाही. किंबहुना दलित पँथर हे त्या इतिहासातील सुवर्णाक्षरात लिहिलेले पान….

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Don`t copy text!