अधात्म आणि शिक्षणाची सांगड घालीत भिमाई आश्रमशाळेत ह.भ.प.भगवान शास्त्री महाराजांचे प्रवचन संपन्न

अशोक घोडके यांजकडून…
इंदापूर(प्रतिनिधी): येथील मातोश्री रमाबाई आंबेडकर विद्यार्थी वसतिगृह ट्रस्टच्या वतीने डॉ. बाबासाहेब आंबेडकर शैक्षणिक संकुलात (दि.7) गुरुवारी रात्री 8 ते 9 वाजे दरम्यान हभप भगवान महाराज (घुगे) यांचे सुश्राव्य प्रवचन झाले. प्रवचनाचा विद्यार्थी व कर्मचार्‍यांनी लाभ घेतला.

महाराजांनी प्रवचनातून शिक्षणाचे महत्त्व विविध उदाहरण दाखल्यांसह विशद केले. स्रोते एकाग्रतेने महाराजांचे प्रवचन श्रवण करीत होते. प्रवचन एककल्ली न होता दोन्ही बाजूने विचारांची देवाण-घेवाण झाल्याने प्रवचनाला उंची मिळाली. महाराजांनी अध्यात्म आणि शिक्षण याची सांगड घालून सर्वसामान्य माणसाच्या जीवनाला स्पर्श होईल अशा विविध विषयांवर अगदी खुसखुशीत शैलीत भाष्य करून विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले.

महाराज प्रवचन व कीर्तनाच्या माध्यमातून सामाजिक प्रबोधन, सांप्रदायाचा प्रसार, पर्यावरण रक्षण, साक्षरता प्रसार, वारकरी संप्रदाय, बहुजन संत साहित्याचा प्रसार व सामाजिक समता प्रस्थापित करणे. आदी मोलाचे कार्य करत आहे.

यावेळी इंदापूर नगरीच्या माजी नगरसेविका व संस्थेच्या अध्यक्षा आयु. शकुंतला रत्नाकर मखरे (काकी) उपस्थित होत्या. यावेळी हभप भगवान शास्त्री महाराजांचा सत्कार भिमाई आश्रमशाळेचे मुख्याध्यापक साहेबराव पवार यांनी नारळ व शाल देऊन केला. तर आभार नानासाहेब यांनी मानले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Don`t copy text!