अशोक घोडके यांजकडून…
इंदापूर(प्रतिनिधी): पुण्यासारख्या नावलौकिक असणारा चहा प्रथमच ग्रामीण भागामध्ये स्वादिष्ट असा बासुंदी चहा मिळणार असल्याचे प्रतिपादन गोतंडी ग्रामपंचायतीचे सरपंच गुरूनाथ नलवडे यांनी केले.
गोतंडी नजीक 54 फाटा याठिकाणी लक्ष्मी बासुंदी चहाच्या दुकानाचे उद्घाटन करतेसमयी श्री.नलवडे बोलत होते. याप्रसंगी माजी चेअरमन आप्पा पाटील, मा. ग्रामपंचायत सदस्य अनिल खराडे, रवी कांबळे, महेश पवार,महेश शिंदे,बबन भोंग इ. मान्यवर उपस्थितीत होते.
श्री.नलवडे पुढे म्हणाले की, दिवसाच्या कोणत्याही वेळी चहा घेतल्याने अंगी ताजेपणा येतो. एक कप गरम चहा तुम्हाला दिवसभराच्या थकव्यानंतर फ्रेश बनवतो. जे विद्यार्थी रात्री उशिरा अभ्यास करतात किंवा रात्रीच्या शिफ्ट लोकांसाठी किंवा ज्यांना फक्त रात्री उशिरा जागायचे आहे त्यांच्यासाठी हा चहा तारणहार ठरणार आहे. एका कप चायवर अनेक गोष्टी घडू शकतात असेही शेवटी ते म्हणाले.
आलेल्या पाहुण्यांचे स्वागत व आभार हॉटेल मालक सतीश कुदळे यांनी मानले. यावेळी सर्व गोतंडी गावचे ग्रामस्थ उपस्थित होते.
Best tea point