अशोक घोडके यांजकडून…
इंदापूर (प्रतिनिधी): टाळ मृदुंग गर्जती, माझ्या विठ्ठलाची कीर्ती ।। गळा वैजयंती माळा, कानी कुंडले शोभती।। या गजरात ज्ञानबा तुकारामाच्या गजरात इंदापूर नगरीत संतश्रेष्ठ जगद्गुरू श्री संत तुकाराम महाराज पालखीचा दोन दिवस मुक्कामामुळे इंदापूर नागरीकांमध्ये आनंदाचे व भक्तीमय वातावरण झालेले आहे. अक्षरश: टाळमृदुंगाच्या गजरात इंदापूरनगरी दुमदमली आहे.
पालखीचे आगमन होताच स्वर्गीय कै.मारूती सोनवणे (पाटील) मित्र परिवार आणि राष्ट्रवादी कॉंग्रेस पार्टी इंदापुर शहरचे कार्याध्यक्ष व इंदापूर नगरपरिषदेचे मा.नगरसेवक दादासाहेब सोनवणे यांनी वारकरी भक्तांसाठी दि.2 आणि 3 जुलैला जेवणाची व दि.4 जुलैला चहा नाष्ट्याची उत्तम सोय केली होती. तरी हजारो वारकरी भक्तानीं चहा नाष्टा व जेवणाचा आस्वाद घेतला.

यावेळी सोमनाथ सोनवणे, सतिश सोनवणे, सौ.विजयाताई खंडाळे, सौ.उज्वला आरडे यांनी विषेश सहकार्य केले. तसेच विलास सोनवणे, ज्ञानेश्वर सोनवणे,विकास सोनवणे, सागर सोनवणे, समिर सोनवणे,दिग्विजय सोनवणे, सनी सोनवणे, मिलन सोनवणे, अजय सोनवणे,रवी सोनवणे, सुमित आरडे, सोमनाथ खंडांळे, सुरज खंडाळे, किरण खंडाळे, अक्षय कुचेकर, चॉंद खंडाळे, अभिषेक कुचेकर, किशोर ढावरे यांनी मोलाचे परिश्रम घेतले. सदर कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी राजु शिंदे, मुकिंद शिंदे, बंडू साठे, सोमनाथ ढावरे यांनी सहकार्य केले.