अशोक घोडके यांजकडून…
इंदापूर(प्रतिनिधी): महाराष्ट्र राज्याचे माजी सार्वजनिक बांधकाम राज्यमंत्री दत्तात्रय भरणे यांच्या मातोश्री गिरीजाबाई उर्फे जीजी विठोबा भरणे यांचेे शुक्रवार दिनांक 1 जुलै रोजी वृृध्दापकाळाने दुःखद निधन झाले त्यानंतर सर्वच स्तरातून हळहळ व्यक्त केली जात आहे. राष्ट्रीय समाज पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष महादेवराव जानकर यांनी भरणेवाडी या ठिकाणी येऊन जीजी यांचे दर्शन घेतले व भरणेे कुटुंबाचे सांत्वन केले.
यावेळी महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष काशिनाथ शेवते, राज्याचे मुख्य महासचिव ज्ञानेश्वर सलगर, पश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष ऍड.संजय माने, पश्चिम महाराष्ट्र युवक अध्यक्ष अजित पाटील, पुणे जिल्हा अध्यक्ष किरण गोफणे, सातारा जिल्हा अध्यक्ष खंडेराव सरक, सोलापूर जिल्हा अध्यक्ष रंजीत दादा सुळ, पुणे जिल्हा नेते तानाजी शिंगाडे, जिल्हा उपाध्यक्ष सतीश शिंगाडे, जिल्हा सरचिटणीस तानाजी मारकड, इंदापूर तालुका अध्यक्ष सतीश तरंगे, इंदापूर शहराध्यक्ष श्रीनिवास सातपुते, विद्यार्थी आघाडी अध्यक्ष अतुल शिंगाडे, सोन्या जानकर, अविनाश मोहिते इ.पदाधिकार्यांसह अनेक कार्यकर्ते उपस्थित होते.