मा.नगरसेवक कुंदन लालबिगे यांच्यातर्फे वारकर्‍यांना बिस्कीट व वेफर्सचे वाटप

बारामती(वार्ताहर): येथील मा.नगरसेवक कुंदन लालबिगे यांच्यातर्फे जगद्गुरू संत तुकाराम महाराज पालखीतील वारकर्‍यांना बिस्कीट व वेफर्सचे वाटप करण्यात आले.

यावेळी मा.नगरसेविका सौ.अशा माने, सौ.कमल कोकरे सौ.अनिता जगताप, सौ.मयुरी शिंदे, श्रीमती संगिता सातव, सौ.शारदा मोकाशी यांच्या उपस्थितीत व शुभहस्ते वाटप करण्यात आले.

कुंदन लालबिगे यांनी आगमनाच्या दर्शनी ठिकाणी लावण्यात आलेल्या राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्ष व खा.शरदचंद्रजी पवार, उपमुख्यमंत्री ना.अजितदादा पवार यांचे लावण्यात आलेले फ्लेक्स आकर्षित ठरून लक्ष वेधत होते.

सदरचा कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी मा.नगरसेवक कुंदन लालबिगे, अमित लालबिगे, युवराज खिराडे, मनोज लालबिगे, सागर लालबिगे, किशोर भोसले, जाकिर सय्यद, दाऊद शेख, आक्रम बागवान, हरी आरडे, मारूती हेगडे, दीपक जेधे, एल ग्रुप, मनोज भगत निशाण आखाडा, अब्बास अली सर्कल, मलिक यंग सर्कल इ. संस्थाचे कार्यकर्ते व पदाधिकार्‍यांनी मोलाचे सहकार्य केले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Don`t copy text!