बारामती(वार्ताहर): आपली भूमी ही संतांची भूमि आहे. या संतांचे आचार, विचार व स्कृती म्हणजे आपल्याला मिळालेली देणगी असल्याचे मत समीर वर्ल्ड स्कूलचे चेअरमन अशपाक सय्यद यांनी व्यक्त केले.
यावेळी अशपाक सय्यद, स्कूलचे मुख्याध्यापक विजय रॉबर्ट व उपमुख्याध्यापिका सौ. रॉबर्ट यांच्या शुभहस्ते पालखीचे पूजन करण्यात आले व पालखीच्या कार्यक्रमास सुरूवात करण्यात आली.
छोट्या चिमुकल्यापासून मोठ्या विद्यार्थ्यांपर्यंत महाराष्ट्रीयन वेशभूषा परिधान केली होती. यामध्ये काष्टा साडी, डोक्यावरती तुळस, विद्यार्थ्यांनी नेहरू शर्ट, पायजमा, टोपी, टाळ अशी वेशभूषा लक्ष वेधत होती.
विठ्ठल रुक्मिणी, संत ज्ञानेश्वर, संत तुकाराम, संत निवृत्ती, संत सोपानदेव, संत मुक्ताबाई, संत एकनाथ, संत नामदेव, संत चोखामेळा, संत सावळा कुंभार, संत नरहरी सोनार, वासुदेव यांच्या वेशभूषा करण्यात आल्या होत्या. पालखी समोर फुगडी घालून पालखीचे स्वागत केले या वेशभूषेतील संत झालले विद्यार्थी आनंदाने माऊली, माऊली, माऊली, ज्ञानोबा माऊली ज्ञानराज माऊली तुकाराम असे टाळमृदृंगाच्या गजरात म्हणत होते. या कार्यक्रमासाठी स्कूलचे चेअरमन, मुख्याध्यापक, उपमुख्याध्यापिका व सर्व शिक्षक शिक्षेकेत्तर कर्मचार्यांनी मोलाचे परिश्रम घेतले.