अशोक घोडके यांजकडून…
इंदापूर(प्रतिनिधी) : साधू संत येता दारा, तोची दिवाळी दसरा या युक्तीप्रमाणे तीन वर्षानंतर पालखीचे आगमन गोतंडी गावात होणार असल्याचे ग्रामपंचायत गोतंडीने स्वागताची जय्यत तयारी केली असल्याचे सरपंच गुरूनाथ नलवडे व ग्रामसेवक श्री.रणवरे यांनी आमच्या प्रतिनिधीशी बोलताना सांगितले.
ज्या ठिकाणी पालखी स्थळ आहे त्याठिकाणी स्वच्छता करण्यात आली आहे. वारकर्यांना स्वच्छ पाण्याची सोय, जेवणाची सोय करण्यात आली आहे. यावेळी गोतंडी ग्रामपंचायतीचे सर्व सदस्य व ग्रामस्थ उपस्थित होते.