अशोक घोडके यांजकडून…
इंदापूर(प्रतिनिधी): इंदापूर तालुक्याच्या सर्वांगीण विकासासाठी मनोमन प्रयत्न केला असल्याचे प्रतिपादन राज्यमंत्री दत्तात्रय भरणे यांनी केले.
रविवार दिनांक 26 जून रोजी इंदापूर शहरातील 18 कोटी रुपयांच्या विविध विकास कामांचा उद्घाटन प्रसंगी आ.भरणे बोलत होते. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी पुणे जिल्हा राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष प्रदीप गारटकर होते.

राज्यमंत्री भरणे म्हणाले की, अडीच वर्षाच्या काळात इंदापूर तालुक्यात सर्वांगीण विकासासाठी प्रयत्न केले. कोट्यावधी रुपयांचा निधी मंजूर करत सर्वांगीण विकास साधण्याचा प्रयत्न केला. राज्याच्या राजकारणात विविध घडामोडी सुरू असून काहीही घडू शकते परंतु आपल्यासाठी सत्ता महत्त्वाची नाही. आपण इंदापूरचा विकास करण्यासाठी सक्षम असल्याचे यावेळी राज्यमंत्री दत्तात्रय भरणे यांनी सांगितले.
यावेळी राष्ट्रवादी कॉंग्रेसचे पुणे जिल्हा अध्यक्ष प्रदीप गारटकर, तालुका अध्यक्ष हनुमंत कोकाटे, कार्याध्यक्ष अतुल झगडे, शहराध्यक्ष बाळासाहेब ढवळे, महिला अध्यक्ष उमा इंगोले, स्थानिक सर्व नगरसेवक आजी-माजी पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.