बारामती (वार्ताहर): प्रामाणिकपणा ही फार मोठी गोष्ट आहे. कसलीही तोंडाला लालच न लागून देता प्रामाणिकपणे आयुष्य जगत असणारी माणसं मिळणं कठीण आहे. आहे तेवढ्यात समाधान मानून पुढे जायचं असा त्यांच्या सुखाचा मंत्र आहे. असेच कित्येक वेळा घडलेले उदाहरण आहे ते अजित ड्रायक्लिनर्सचे प्रोप्रा:अजित लक्ष्मण पवार यांनी ड्रायक्लिनर्ससाठी आलेल्या कपड्यांमध्ये सापडलेले 10 हजार रूपये ग्राहकास परत केले.
कसबा येथे सुप्रसिद्ध असलेले अजित लक्ष्मण पवार यांचे अजित ड्रायक्लिनर्स दुकान आहे. कपडे धुणे व इस्त्री करीता ग्राहक या दुकानाची पसंती करतात. ग्राहकांचा विश्र्वास संपादन करून अजित ड्रायक्लिनर्सचे नाव बारामतीच्या पंचक्रोशित घेतले जाते. कित्येक वेळा कपडे धुण्यास टाकल्यानंतर त्या कपड्यांमध्ये मौलवान वस्तु, पैसे येथील कामगार व मालकांना सापडले आहेत त्यांनी त्या ग्राहकास संपर्क साधून विनम्रतापूर्वक त्या वस्तु व पैसे परत केले आहेत.
असाच एक प्रकार घडला तात्या माने नावाच्या ग्राहकाने कपडे ड्रायक्लिनर्स करीता दिले. रीतसर पावती घेऊन गेले. दुसर्या दिवशी त्यांच्या लक्षात आले खिश्यात 10 हजार रूपये तसेच आहेत. कामगारांनी कपडे धुण्यापूर्वी सर्व खिश्यांची चाचपणी केल्यानंतर खिश्यामध्ये 10 हजार रूपये आढळून आले. कामगारांनी मालकांना याबाबत कल्पना दिली. अजित पवार यांनी क्षणाचाही विलंब न लावता तात्या माने यांना तुमची रक्कम घेऊन जाण्यास सांगितले. माने यांनी माझ्याच खिश्यात पैसे सापडले का? मी रक्कम विसरून गेलो होतो असे सांगितले. तात्या माने यांनी मालकांसह सर्व कामगारांचे आभार व्यक्त केले.
असा अनुभव अजित ड्रायक्लिनर्सच्या मालक व कामगारांना नवखा नव्हे. येथील कामगार ग्राहक देवो भवं हे ब्रीद वाक्य मनाशी बाळगून इमाने इतबारे काम करीत आहेत व मालक व अजित ड्रायक्लिनर्सचे नाव उज्वल करीत आहेत.