संत निरंकारी मिशननेही राबविला योगा दिवस

अशोक कांबळे यांजकडून…
बारामती(वार्ताहर):आंतरराष्ट्रीय योग दिनानिमित्त संत निरंकारी मिशनच्या वतीने सातारा झोनमधील बारामती शाखेसह अठरा ठिकाणी आज (ता.21) योगा दिन साजरा करण्यात आला. सातारा झोनचे प्रभारी नंदकुमार झांबरे यांच्या नेतृत्वाखाली हा उपक्रम पार पडला. बारामती येथील संत निरंकारी भवनात सकाळी 6 वाजता योग वर्गाचे आयोजन करण्यात आले होते

संत निरंकारी चॅरिटेबल फाउंडेशनच्या माध्यमातून 2015 सन पासूनच योग दिवस मोठ्या उत्साहाने साजरा केला जात आहे. यंदा मंडळाचे सचिव आदरणीय श्री.जोगिंदर सुखीजा यांच्या मार्गदर्शनाखाली संपूर्ण देशभरात योग दिन करण्यात आला.

सद्गुरु माता सुदीक्षाजी महाराज अनेकदा आपल्या विचारांमध्ये आध्यात्मिक ज्ञानाबरोबरच आपल्याला शारीरिक व मानसिकदृष्ट्‌या स्वस्थ राहण्याची प्रेरणा देत असतात. या योग दिवसाचा उद्देशही हाच आहे, की सर्वांमध्ये एकाग्रता आणि सामुदायिक सामंजस्याच्या भावनेचा संचार व्हावा, ज्यायोगे हे जीवन आणखी सुंदर व उत्तम रीतीने जगता येईल. वर्तमान समयाला तनावपूर्ण व नकारात्मक विचारांचा प्रभाव प्रत्येक व्यक्तीवर पडत आहे. अशा वेळी ईश्वराने जे हे मनुष्य तन आपल्याला दिलेले आहे त्याचा सांभाळ योगाच्या माध्यमातून आपल्या ज्ञानेंद्रियांना जागृत करुन आध्यात्मिकतेने युक्त जीवन जगता येऊ शकते. योग ही प्राचीन भारतीय परंपरेची अमूल्य देणगी आहे. मन आणि शरीर यांच्या एकतेचे ते प्रतीक आहे. योग हा केवळ व्यायाम नाही तर तो सकारात्मक भावना जागृत करुन तनावमुक्त जीवन जगण्याची प्रेरणा देतो. योगाद्वारे आपली जीवनशैली सहज व सक्रिय करुन स्वस्थ जीवन जगता येते. वर्तमान काळात तनावमुक्त जीवन जगण्यासाठी योगाची नितांत गरज आहे. आज ही संस्कृती संपूर्ण विश्वातील जवळपास सर्व देशांकडून अंगीकारली जात आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Don`t copy text!