बारामती(वार्ताहर): समीर वर्ल्ड स्कूल मध्ये मोठ्या उत्साहात ग्रीन डे साजरा करण्यात आला.
शाळेचे चेअरमन अशपाक सय्यद सर व प्रिन्सिपल विजय रॉबर्ट व सौ.रॉबर्ट मॅडम यांनी स्वतः एक एक रोप लावून कार्यक्रमाला सुरुवात केली.
शाळेचे चेअरमन व प्रिन्सिपल यांनी आपले विचार विद्यार्थ्यांसमोर मांडले दिवसेंदिवस उजाड होत चाललेल्या आपल्या धरतीला फक्त झाडेच वाचवणार आहेत. अन्य कोणी ही नाही अशा या जीवन दात्या वृक्ष देवाची आपण प्रामुख्याने जोपासना केली पाहिजे वृक्ष आपल्याला किती बाबतीत मदत करतात याचे महत्त्व सांगून माणसाचे जीवन वृक्षांनी कसे व्यापून राहिले आहेत हे त्यांनी सांगितले .
चिमुकल्यांनी आपल्या छोट्या-छोट्या हातांनी एक एक रोप लावून त्याची देखभाल करायची शपथ घेतली. तसेच लहान विद्यार्थ्यांनी चित्रे काढून व मोठ्या विद्यार्थ्यांनी रांगोळी मधून पर्यावरण संरक्षणाचा प्रसार केला. हा कार्यक्रम शाळेचे चेअरमन ,प्रिन्सिपल सर, शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी यांच्या सहयोगाने पार पडला.