बारामती(वार्ताहर): ठसका लागला, ठेसकळा किंवा चटका बसला तर प्रथमत: तोंडातून आईच शब्द बाहेर पडतो अशा मातृत्व दिनानिमित्त सखी ब्युटी पार्लरचे मुख्य उर्मिला म्हेत्रे यांच्या अथक प्रयत्नातून मुंबईचे सुप्रिसद्ध अल्का गोविंद यांच्याकडून बारामतीच्या महिला ब्युटिशनना ब्युटी पार्लरचे नाममात्र प्रवेश फी आकारून प्रशिक्षण देवून एक आगळा वेगळा मातृत्वदिन साजरा केला.
मुंबईचे सुप्रसिद्ध मेकअप आर्टिस्ट अल्का गोविंद यांनी उपस्थित महिलांना साध्या आणि सोप्या भाषेत मार्गदर्शन करुन आपल्या कलेतून माहिती देवून मेकअपचे प्रशिक्षण दिले.

भिगवण रोड वरील अक्षय गार्डन याठिकाणी 12 जून 2022 रोजी दु.1 ते सां.6 यावेळेत कार्यक्रम घेण्यात आला. कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून ज्येष्ठ संपादक बापुराव शेंगडे, गौरव जोगदंड, वेलनेस कोच निता आरडे, प्रितम शेंडगे इ. मान्यवर उपस्थित होते. या कार्यक्रमाला टेंभूर्णी, कर्जत, इंदापूर, अकलूज, नातेपुते, दौंड,निरा,पणदरे, फलटण व बारामती तालुका व शहरातील 460 महिलांनी प्रशिक्षणाचा लाभ घेतला. कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी श्रावणी ब्युटी पार्लरचे हेमा इंगळे, काजल ब्युटी पार्लरचे शैला जगताप यांनी मोलाचे परिश्रम घेतले. कार्यक्रमाचे सुत्रसंचालन राज गोविंद यांनी तर शेवटी आभार उर्मिला म्हेत्रे यांनी मानले.
कोरोना व लॉकडाऊन काळात राज्य शासनाचे वेळोवेळी दिलेले आदेशाचे पालन करीत ब्युटी पार्लर व्यावसाय पूर्णपणे बंद होता. कित्येकांना उपासमारीचा सामना करावा लागला. अशा खडतर परिस्थितीत सुद्धा महिलांचा आत्मविश्र्वास ढासळला नाही. पुन्हा व्यवसायात उभारी घेतली. त्यांच्या कला गुणांना वाव देण्यासाठी व नवनव्या कला त्यांनी आत्मसात करून व्यवसायाला गती देण्यासाठी प्रशिक्षण घेण्याचा उद्देश होता. – उर्मिला म्हेत्रे, सखी ब्युटी पार्लर