बारामती(वार्ताहर): आंतरराष्ट्रीय योग दिनानिमित्त बारामती शहर पोलिस स्टेशनमध्ये नेहरू युवा केंद्रामार्फत योग महाविद्यालयचे शिक्षकांनी पोलीसांना शारीरिक मानसिकदृष्ट्या सक्षम राहण्यासाठी योग व प्राणायामचे धडे दिले. व या पुढे दररोज स्वतःसाठी वेळ काढून योग व प्राणायाम करण्यात येईल असे पोलीसांनी यावेळी सांगितले.
सर्व अधिकारी आणि कर्मचारी यांनी समाधान व्यक्त केले. पोलीसांना बंदोबस्त असल्या कारणाने योग दिनाच्या एक दिवस अगोदरच शिबिर घेतले. सदर शिबीर पोलीस अधीक्षक डॉ.अभिनव देशमुख, अपर पोलिस अधीक्षक मिलींद मोहिते, उपविभागीय पोलीस अधिकारी गणेश इंगळे यांचे मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक सुनील महाडिक यांनी नेहरू युवा केंद्राचे स्वयंसेवक यांचे मदतीने घेतले.