बारामती(वार्ताहर): येथील महात्मा फुले कॉ.ऑप हौसिंग सोसायटीच्या चेअरमनपदी ऍड.सुशील अहिवळे तर सचिवपदी काळुराम चौधरी यांची बिनविरोध निवड करण्यात आली.
सोमवार दि.20 जून रोजी महात्मा फुले कॉ.ऑप हौसिंग सोसायटीची सर्वसाधारण सभा सर्व सभासदांच्या उपस्थितीत संपन्न झाली. यावेळी अहिवळे आणि चौधरी यांच्या सोबतच गुलाबराव लोंढे, अशोक जगताप, गणेश अहिवळे, सनी जगताप, छाया कांबळे, पुष्पा सरोदे यांची संचालक मंडळावर निवड करण्यात आली. यावेळी नवनिर्वाचित संचालक मंडळाचे सर्व सभासदांकडून अभिनंदन करण्यात आले.
दरम्यान ही सर्वसाधारण सभा सोसायटीचे संस्थापक चेअरमन झुंबरलाल अहिवळे यांच्या अध्यक्षतेखाली अत्यंत खेळीमेळीच्या वातावरणात संपन्न झाली.