बारामती(वार्ताहर): येथील विद्या प्रतिष्ठान व एन्व्हॉर्यमेंटल फोरम ऑफ इंडिया यांच्या वतीने योगदिनाचे औचित्य साधून योगशिबीराचे आयोजन केले गेले.
एन्व्हॉर्यमेंटल फोरमच्या अध्यक्षा सुनेत्रा पवार यांच्या संकल्पनेतून योग शिबीराचा उपक्रम दरवर्षी राबविला जातो. यंदा योगाचार्य डॉ. नीलेश महाजन व त्यांच्या सहकार्यांनी विद्या प्रतिष्ठानचे विद्यार्थी, प्राध्यापक व शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी तसेच फोरम सदस्य यांना योगाचे धडे दिले.याप्रसंगी त्यांनी योगसाधने बाबत मोलाची माहिती दिली. दरवर्षी योगदिनाचे औचित्य साधून एन्व्हॉर्यमेंटल फोरम व विद्या प्रतिष्ठान यांच्या वतीने या उपक्रमाचे आयोजन केले जाते. विद्या प्रतिष्ठानचे रजिस्ट्रार श्रीश कंभोज यांनी डॉ. नीलेस महाजन यांचा या प्रसंगी सत्कार केला. या शिबीरास सर्वांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला.