बारामती(वार्ताहर): मानव सुरक्षा सेवा संघ व भारती हॉस्पिटल पुणे यांच्या संयुक्त विद्यमाने विविध आजारांवर माता रमाई भवन याठिकाणी सर्व रोग निदान शिबीराचे आयोजन करण्यात आले होते. या शिबीरात बहुसंख्य गरीब व गरजुंनी लाभ घेतला.
या शिबीरास मानव सुरक्षा संघाचे प्रदेश अध्यक्ष उमेश शिंदे, प्रदेश महिला अध्यक्षा सौ.रेणूताई येळगांवकर हे प्रमुख मान्यवर उपस्थित होते. तसेच बारामती राष्ट्रवादी कॉंग्रेसचे शहर अध्यक्ष इम्तियाज शिकीलकर, मा.उपनगराध्यक्ष नवनाथ बल्लाळ, मा.नगरसेवक प्रा.रमेश मोरे, गणेश सोनवणे, सौ.सुनिता देवरे, सामाजिक कार्यकर्ते गौतम शिंदे इ. उपस्थित होते.
अन्याय अत्याचारा विरोधात लढा देणे व त्याला वाचा फोडणे ही मानव सुरक्षा संघाची ध्येयधोरणं असल्याचे सौ.रेणूताई येळगांवकर यांनी मनोगत व्यक्त करताना सांगितले.
मानव सुरक्षा संघ भारत या संघटनेमध्ये युवकांनी मोठ्या संख्येने प्रवेश करून समाज कार्य करावे असे उमेश शिंदे यांनी सांगितले. या कार्यक्रमाचे आयोजन मानव सुरक्षा संघाचे पश्र्चिम महाराष्ट्र अध्यक्ष कैलास शिंदे, चक्रपाणी चाचर पुणे कार्याध्यक्ष व तालुकाध्यक्ष गणेश भोसले, तालुकाप्रमुख चेतन शिंदे, गजानन गायकवाड यांच्यासह सर्वच पदाधिकार्यांनी केली.
भाऊसाहेब मांढरे यांच्या स्मरणार्थ स्नेह भोजनाचा आस्वाद उपस्थित मान्यवर व शिबिरार्थ्यांनी घेतला. मानव सुरक्षा सेवा सेवासंघाचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. या शिबीरात नेत्र, अस्थी व रक्त तपासणी करण्यात आली.
यावेळी वीर शहीद जवान अशोकजी इंगवले यांच्या आई-वडिलांना आदर्श माता-पिता असा पुरस्कार देण्यात आला. भारताचे नाव भारताबाहेर नेहुन आयर्न मॅन 2022 हा पुरस्कार मिळवणारे डॉ.पांडुरंग गावडे यांना देखील पुरस्कार देण्यात आला. ओंकार राजेंद्र जगताप या युवकाने एम.बी.बी. एस. या डॉक्टरेट परीक्षेमध्ये नाविन्यपूर्ण यश मिळवल्याबद्दल शुभम शिंदे व सुरज मोरे या दोन युवकांना पी.एस.आय पदी नियुक्ती झाल्याबद्दल त्यांचा देखील सन्मान करण्यात आला. तसेच मानव सुरक्षा सेवा संघाच्या वतीने राष्ट्रीय अधिवेशनात प्रथम क्रमांक काने सन्मानित केलेल्या कैलासजी शिंदे (पश्चिम महाराष्ट्र उपाध्यक्ष) यांना बारामती तालुक्याच्या वतीने उत्कृष्ट आदर्श समाजसेवक असा पुरस्कार देण्यात आला. रुक्मिणीताई लोणकर यांना देखील ज्येष्ठ आदर्श समाजसेविका असा पुरस्कार देण्यात आला.