बा.न.प.कामगार पतसंस्थेचे चेअरमनपदी सुनिल धुमाळ तर व्हा.चेअरमन प्रतिभा सोनवणे

बारामती(वार्ताहर): बारामती नगर परिषद कामगार सहकारी पतसंस्थेचे चेअरमनपदी सुनिल भगवान धुमाळ तर व्हा.चेअरमन प्रतिभा मनोज सोनवणे यांची एकमताने बिनविरोध निवड झाली.

यावेळी उपनिबंधक कार्यालयात निवडणूक प्रक्रिया घेण्यात आली चेअरमनपदासाठी सुनिल धुमाळ यांचा तर व्हा.चेअरमनपदासाठी प्रतिभा सोनवणे यांचे दोघांचेच अर्ज दाखल झाल्याने निवडणुक निर्णय अधिकारी श्रीमती एस.पी.गोलांडे यांनी अविरोध निवडून आल्याचे जाहीर केले. यावेळी 13 पैकी 12 संचालक उपस्थित होते.

याप्रसंगी नुतन चेअरमन सुनिल धुमाळ व प्रतिभा सोनवणे यांनी सांगितले की, आम्ही सभासदांच्या हितासाठी व आर्थिक गरजा भागविण्यासाठी तसेच संस्थेचा आणखीन नावलौकिक वाढविण्यासाठी आम्ही प्रयत्नशील राहु. यावेळी पॅनेलचे प्रमुख राजेंद्र सोनवणे यांनी सर्व संचालकांच्या वतीने सुनिल धुमाळ, प्रतिभा सोनवणे यांचा पुष्पगुच्छ देऊन अभिनंदन करण्यात आले. यावेळी माजी चेअरमन राजेंद्र सोनवणे, फिरोज आत्तार, भालचंद्र ढमे, दादासाहेब जोगदंड, चंद्रकांत सोनवणे,उमेश लालबिगे, संजय चव्हाण,विजय शितोळे, अजय लालबिगे, सुवर्णा भापकर उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Don`t copy text!