अशोक घोडके यांजकडून…
इंदापूर(प्रतिनिधी): स्वराज्य निर्मितीची प्रेरणा देण्यापासून ते स्वराज्य उभारणीच्या कार्यात छत्रपती शिवरायांच्या पाठीमागे खंबीरपणे उभे राहणार्या त्यांना वेळोवेळी मार्गदर्शन करत आईसोबत गुरूचीही भूमिका पार पाडणार्या राजमाता जिजाऊ मॉंसाहेब यांचा 348 वा स्मृतिदिन मातोश्री रमाबाई आंबेडकर विद्यार्थी वसतिगृह ट्रस्टच्या वतीने आज डॉ.बाबासाहेब आंबेडकर शैक्षणिक संकुलात कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.
यावेळी बहुजन मुक्ती पार्टीचे राष्ट्रीय महासचिव व संस्थेचे कार्याध्यक्ष ऍड. राहुल मखरे यांच्या हस्ते राजमाता जिजाऊ मॉंसाहेबांच्या प्रतिमेस पुष्पहार तर माजी नगराध्यक्ष दिवंगत रत्नाकर मखरेंच्या प्रतिमेला पुष्प अर्पण करून अभिवादन करण्यात आले.
यावेळी संस्थेच्या अध्यक्षा शकुंतला रत्नाकर मखरे, सचिव ऍड.समीर मखरे, शिवाजीभाऊ चंदनशिवे, शहरातील बहुसंख्य कार्यकर्ते तसेच संस्थेतील मुख्याध्यापक, प्राचार्या व शिक्षक – शिक्षकेतर कर्मचारी कार्यक्रमास उपस्थित होते.यावेळी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन हिरालाल चंदनशिवे यांनी केले.