अशोक घोडके यांजकडून…
इंदापुर(प्रतिनिधी): निमगाव केतकी येथील कौठी मळा जिल्हा परिषद शाळेमध्ये निमगाव केतकीचे युवा नेते तुषार (बाबा) जाधव यांच्या वाढदिवसानिमित्त ग्रामपंचायत सदस्या रीना सुभाष भोंग व ऍड. सुभाष भोंग यांच्यातर्फे विद्यार्थ्यांना वह्या, पेन, पेन्सिल तसेच गोष्टींची पुस्तके इ. शालेय वस्तुंचे वाटप करण्यात आली.
वाढदिवसांवरील अनावश्यक खर्च टाळून गरजू विद्यार्थ्यांना मदत करणे हा आदर्श भोंग कुटुंबियांनी समाजापुढे ठेवला आहे. समाजातील इतर नागरिकांनी सुद्धा वाढदिवसावरील अनावश्यक खर्च टाळून गोरगरिबांना मदत करण्याचे आवाहन ऍड. सुभाष भोंग यांनी केले.
यावेळी जिल्हा परिषद शाळा कौठीमळा शाळेच्या वतीने तुषार(बाबा) जाधव यांचा वाढदिवस केक कापुन साजरा करणेत आला. यावेळी बोलताना तुषार(बाबा) जाधव यांनी सांगितले की, येणार्या काळात शाळेच्या प्रत्येक अडीअडचणी सोडविण्याचा प्रयत्न केला जातील अशी ग्वाही दिली.
यावेळी मारुती भोंग,अनिल भोंग,प्रशांत बंडगर,मंगेश भोंग, शाळेच्या मुख्याध्यापिका कुदळे मॅडम, शिक्षिका सुरेखा भोंग, मॅडम,अंगणवाडी मुख्याध्यापिका सरस्वती भोंग मॅडम,सेविका मनीषा भोंग मॅडम व इतर ग्रामस्थ उपस्थित होते.