मातंग एकता आंदोलनाच्या प्रदेश सचिवपदी शहाजी मांढरे

बारामती(वार्ताहर): मातंग एकता आंदोलन संघटनेच्या प्रदेश सचिवपदी बारामतीचे शहाजी मारूती मांढरे यांची नुकतीच संघटनेचे संस्थापक अध्यक्ष तथा माजी गृहराज्यमंत्री रमेश बागवे व कार्याध्यक्ष तथा पुणे महानगर पालिका नगरसेवक अविनाश बागवे यांनी पत्र देवून एकमताने निवड केली.

मातंग एकता आंदोलनच्या नवनिर्वाचित पदाधिकारी निवडीबाबत सत्कार तसेच अडीअडचणींबाबत विचार व चर्चा करण्यासंदर्भात मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी महाराष्ट्र समन्वयक विठ्ठल थोरात यांच्या शुभहस्ते निवडीचे पत्र शहाजी मांढरे यांना प्रदान करण्यात आले. शाल, श्रीफळ, सन्मानचिन्ह व सन्मानपत्र देवून त्यांचा यथोचित सत्कार करण्यात आला. यावेळी संघटनेचे पुणे जिल्हाध्यक्ष राजू भाऊसाहेब मांढरे यांच्यासह तालुका व जिल्ह्यातील पदाधिकारी, समाज बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Don`t copy text!