अशोक घोडके यांजकडून…
इंदापूर(प्रतिनिधी): मंथन राज्यस्तरीय स्पर्धा परीक्षेत गोतंडी गावची कन्या व श्री वर्धमान विद्यालया तील इ.7वी ची विद्यार्थिनी आकांशा यशवंत पाटील ही गुणवत्ता यादीत प्रथम आली. 10 एप्रिल 2022 रोजी संपन्न झाली. या स्पर्धेत कु.आकांक्षा पाटील हिने 164 गुण प्राप्त करून राज्यात 55 वी व केंद्रात प्रथम क्रमांक पटकावला आहे.
या स्पर्धा परीक्षेतील विद्यार्थ्यांना सुरज मोरे, देवराम प्रधान, लक्ष्मी सरगर, स्मिता मुसळे, मीनाज शेख यांनी बहुमोल मार्गदर्शन केले. या विद्यार्थ्यांचे व शिक्षकांचे अभिनंदन व कौतुक शाळा समितीचे अध्यक्ष अमोल गेंगजे, प्राचार्य हनुमंत कुंभार, उपमुख्याध्यापक बाळासाहेब पडारी, उपप्राचार्य अरुण निकम, पर्यवेक्षक काशिनाथ हिरवे, माणिक पिसे यांनी केले. तसेच भविष्यातील परीक्षेसाठी व यशस्वी जीवनासाठी शुभेच्छा दिल्या.