अशोक घोडके यांजकडून..
इंदापूर(प्रतिनिधी): इंदापूर ते पिपरी खुर्द (सुगाव) बस सेवा पूर्वीप्रमाणे चालू करण्याची मागणी राष्ट्रवादी युवक कॉंग्रेसच्या वतीने आगार व्यवस्थापक यांना निवेदन देवून करण्यात आली.
कोरोनाच्या काळ व नंतर एस.टी. संपामुळे पिंपरी खुर्द (सुगाव) एस.टी.च्या फेर्या बंद झाल्या होत्या. परंतु आता सर्व व्यवहार पूर्वरत झाल्याने, महाराष्ट्रात अनेक ठिकाणी एस. टी. सुरु झालेली आहे. शाळा, कॉलेज सुरु झाल्यामुळे सध्या एस. टी. चालू नसल्यामुळे विद्यार्थी, ज्येष्ठ नागरिकांचे हाल होत आहेत. पावसाळा सुरू झाल्याने शेतकर्यांना सुद्धा त्याची गरज आहे. तरी लवकरात लवकर पूर्वीप्रमाणे एस. टी. ची सेवा चालू करावी अशी मागणी करण्यात आली आहे. यावेळी पुणे जिल्हा राष्ट्रवादी युवक सरचिटणीस पवार, इंदापूर राष्ट्रवादी कॉंग्रेस पार्टीचे सरचिटणीस नाना भोईटे, शिरसोडी सोसायटीचे रमेश पेटकर, युवा नेते सतीश नरुटे, उपसरपंच सुनील मोहिते-पाटील, विशाल पवार आदी उपस्थित होते.