बारामती(वार्ताहर): अखिल तांदुळवाडी वेस तरुण मंडळ संचलित पद्मविभूषण आदरणीय श्री.शरदचंद्रजी पवार साहेब फिटनेस हेल्थ क्लब कोष्टीगल्ली बारामती याठिकाणी 10 जून राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाचा 23 वा वर्धापन दिन उत्साहात साजरा करण्यात आला.
राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाचे बारामती शहर अध्यक्ष इम्तियाज शिकीलकर व राष्ट्रवादी कॉंग्रेस पुणे जिल्हा ओबीसी सेलचे कार्याध्यक्ष नितीन शेंडे यांच्या शुभहस्ते केक कापून वर्धापन दिन साजरा करण्यात आला.
यावेळी बारामती सहकारी बँकचे माजी चेअरमन अविनाश भापकर, राष्ट्रवादी कॉंग्रेस पुणे जिल्हा युवक उपाध्यक्ष दीपक बर्गे, पत्रकार तैनुर शेख, मा.नगरसेवक नवनाथ बल्लाळ, राष्ट्रवादी कॉंग्रेस बारामती शहरचे कार्याध्यक्ष विशाल जाधव, बारामती शहर उपाध्यक्ष निलेश मोरे, अखिल तांदुळवाडी वेस तरुण मंडळाचे माजी अध्यक्ष श्रीकांत जाधव, जिमचे प्रशिक्षक संतोष जगताप इ. उपस्थित होते.
यावेळी नितीन शेंडे व इम्तियाज शिकीलकर यांनी शुभेच्छा दिल्या.