बारामती(वार्ताहर): येथील कै.रामचंद्र भिसे (गुरुजी) वैद्यकिय प्रतिष्ठानच्या वतीने जनसेवा हिच ईश्वरसेवा या उद्देशाने प्रेरीत देहू ते पंढरपूर पालखी मार्गावर आषाढी वारीत संत तुकाराम महाराज पालखी सोहळयातील वारकर्यांसाठी श्रीमती सोनियाजी राजीवजी गांधी फिरता मोफत दवाखाना ही सुविद्या उपलब्ध करुन दिली जाणार आहे. अशी माहिती संस्थेचे अध्यक्ष डॉ.विजय भिसे यांनी दिली आहे.
श्री.संत तुकाराम महाराज संस्थान श्री क्षेत्र देहू संस्थानच्या सोहळा प्रमुखांचे पत्र व आषाढी वारी 337 वा पालखी सोहळा सन 2022 चे वेळापत्रक ही संस्थेस नुकतेच प्राप्त झाले आहे.
दि.20 जुन 2022 रोजी संत तुकाराम महाराज पालखीचे प्रस्थान होणार आहे.देहू ते पंढरपूर मार्गावर या पालखी सोहळयातील वारकर्यांसाठी मोफत आरोग्य तपासणी व औषधोपचार करण्यात येणार असुन यावर्षी रुग्णवाहिका सेवाही पुरविण्यात येणार आहे. त्याचबरोबर पालखी मार्गावर मोफत तपासणी व औषधोपचार करणार्या संस्थांना ही औषधांची मदत केली जाणार आहे. या जनसेवेच्या उपक्रमात ज्या दानशूर व्यक्तींना सहभागी व्हायचे असेल त्यांनी डॉ.विजय भिसे यांचेशी भ्रमणध्वनी . क्रं.9325330624 या क्रमांकावर संपर्क साधावा असे आवाहन करण्यात येत आहे.
कै.रामचंद्र भिसे (गुरुजी) वैद्यकिय प्रतिष्ठानचे या जनसेवेच्या उपक्रमाचे हे अखंड 22 वे वर्ष असुन या उपक्रमातील पथकात डॉ.अप्पा आटोळे व डॉ.योगेश पाटील (लासुर्णे) राजेंद्र गायकवाड हे मदतनीस सहभागी होणार आहेत अशी माहिती संस्थेचे अध्यक्ष डॉ.विजय भिसे यांनी दिली आहे.