बारामती(वार्ताहर): दरवर्षीप्रमाणे याही वर्षी राष्ट्रमाता पुण्यश्र्लोक अहिल्यादेवी प्रतिष्ठानतर्फे अहिल्यादेवी होळकर यांचा 297 वी जयंतीनिमित्त विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले असल्याचे प्रतिष्ठानचे संस्थापक अध्यक्ष निलेश ढालपे यांनी कळविले आहे.
18 जून रोजी सकाळी 6 ते 8 श्री सिध्देश्वर मंदीर, श्री काशिविश्वेश्वर मंदीर,श्री पांढरेश्वर मंदीर व श्री रामेश्वर मंदीर येथे अभिषेक करण्यात येणार आहे. सकाळी 11वा. पुण्यशलोक अहिल्यादेवी मॉसाहेब यांच्या मूर्तीचे पुजन व पुण्यश्लोक अहिल्यादेवी चौकास हार अर्पण सोहळा व सत्कार समारंभ होणार आहे. दुपारी 3 वा. फटाक्याच्या अतिषबाजीत मिरवणूकीचे भव्य स्वागत व 1 टन भंडारा उधळण करण्यात येणार आहे. दि.19 जून रोजी सकाळी 8 ते 10 या वेळेत 51 झाडाचे वृक्षरोपण करण्यात येणार आहे.
मिरवणुकीचे भव्य स्वागत सिनेमा रोड, धालपे बिल्डींग याठिकाणी होणार असल्याचे अशिष घोरपडे, नागेश नागे, आनंद खुळपे, अश्विन भोकरे, अनिकेत धालपे, आण्णा साबळे, मुन्ना पठाण, सचिन सकट, अरुण काटे यांनी सांगितले आहे.