महेश गायकवाड मित्र परिवाराचा विधायक उपक्रम : सर्वत्र कौतुक
बारामती(वार्ताहर): कार्यकर्त्याची ओळख त्याच्या कार्यातून पक्षश्रेष्ठींना होत असते. असेच वसंतनगर येथील महेश अरविंद गायकवाड राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाच्या माध्यमातून विविध समाजोपयोगी, विधायक स्वरूपाचे उपक्रम राबवित आलेले आहेत.

त्याचाच एक भाग म्हणून राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाच्या दि.10 जून रोजी 23 व्या वर्धापन दिनानिमित्त नेत्र तपासणी शिबीराचे आयोजन करण्यात आले होते. या शिबीरास नागरीकांनी भरभरून उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. 230 नागरीकांनी मोतीबिंदू शस्त्रक्रिया शिबीरात सहभाग दर्शविला.
या शिबीराचे उद्घाटन राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाचे शहराध्यक्ष इम्तियाज शिकीलकर यांच्या शुभहस्ते करण्यात आला. यावेळी महिला शहराध्यक्ष सौ.अनिता गायकवाड, विशाल जाधव इ. मान्यवर उपस्थित होते.
बुधराणी पुणेचे डॉ.मंजीर शेख यांनी नेत्र तपासणी करून सर्वांना मार्गदर्शन केले.