अशोक घोडके यांजकडून…
इंदापूर(प्रतिनिधी): निरवांगी विविध कार्यकारी सोसायटीच्या निवडणुकीत राज्याचे माजी मंत्री व भाजप नेते हर्षवर्धन पाटील आणि पीडीसी बँकेचे संचालक आप्पासाहेब जगदाळे यांच्या नेतृत्वाखाली भारतीय जनता पक्षाने 12 जागांवर विजय संपादन करीत एक हाती सत्ता मिळवली आहे तर विरोधकांना 1 जागेवर समाधान मानावे लागले आहे.
रमेश गायकवाड, दत्तात्रय पोळ, महादेव चव्हाण, सुरज जाधव , सचिन सहदेव रासकर ,बाळासो काशीद, पोपट पोळ, राजेंद्र गुरव, केशराबाई जाधव, सुजाता पोळ, सागर कांबळे, पारेकर दादाराम महादेव या विजयी उमेदवारांचे हर्षवर्धन पाटील आणि आप्पासाहेब जगदाळे यांनी अभिनंदन करून पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.
या निवडणूकीत अनेकांना पराभवाचा सामना करावा लागलेला दिसत आहे.