अशोक घोडके यांजकडून…
इंदापूर(प्रतिनिधी): गोतंडी याठिकाणी पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांची जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून पश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष शशिकांत तरंगे,सम्राट मोरे सेना प्रदेशाध्यक्ष अर्जुन दादा सलगर प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते.
या कार्यक्रमाची सुरुवात दीप प्रज्वलन करण्यात आली यानंतर प्रबोधनाचा कार्यक्रम करण्यात आला व त्यानंतर भव्यदिव्य अशी मिरवणूक काढण्यात आली या ठिकाणी गोतंडी गावचे सामाजिक कार्यकर्ते अशी हौशीराव यादव यांचा वाढदिवस साजरा करण्यात आला.या कार्यक्रमाला उपस्थित सामाजिक कार्यकर्ते आप्पा माने,लक्ष्मण देवकाते,माऊली वाघमोडे,किरण गोपने, गोतंडी गावचे सरपंच गुरुनाथ नलवडे व गोतंडी गावातील सर्व ग्रामस्थ उपस्थित होते. या कार्यक्रमाचे नियोजन नाना बिबे, सौरभ अर्जुन, बाबुलाल शेख, प्रतिक बिबे, प्रशांत घोडके, भैया बिबे, रोहित कांबळे, ओंकार साळवे, आदेश भोसले यांनी उत्कृष्ट उत्कृष्ट नियोजन केले.