गोतंडीत ग्रामीण जागरूकता कार्यानुभव कार्यक्रमाचे उद्घाटन

अशोक घोडके यांजकडून
इंदापूर(प्रतिनिधी): महात्मा फुले कृषी विद्यापीठ, राहूरी संलग्नित शिक्षण प्रसारक मंडळ अकलूज, संचालित रत्नाई कृषी महाविद्यालय अकलूज या महाविद्यालयातील विद्यार्थीनींनी इंदापूर तालुक्यातील गोतंडी गावात कृषी सल्ला केंद्राचे उद्घाटन केले. याअंतर्गत मृदा परीक्षण पशु लसीकरण, प्रदूषण, उपाय, जैविक शेती, रासायनिक खतांचा नियंत्रित वापर इ. प्रात्यक्षिक केले. पर्यावरणाचा र्‍हास रोखून समतोल साधण्याबाब चर्चा केली.

या कार्यक्रमास गोतोंडी गावचे सरपंच गुरुनाथ नलवडे, उपसरपंच परशुराम जाधव, ग्रामसेवक बी. के रणवरे, आबा मारकड, संजू बिबे, आप्पा पाटील, दत्तू बिबे, रामभाऊ काळे, कदम साहेब, पापत साहेब, हरीभाऊ खाडे, अनिल खराडे, किसना बनकर, गणेश अर्जुन,नवनाथ मारकड, बनसोडे मेंबर, बापू पिसे, प्रकाश मोरे व सर्व शेतकरी बांधव उपस्थित होते. उपस्थित मान्यवरांनी कृषीविषयक मनोगत व्यक्त केले.

सदरचा कार्यक्रम महाविद्यालयाचे प्राचार्य आर.जी.नलवडे, कार्यक्रम समन्वयक एस.एम.एकतपुरे, कार्यक्रम अधिकारी एस.एल.मस्कर यांच्या मार्गदर्शनाखाली होणार आहे.

या कार्यक्रमाचे आयोजन रत्नाई कृषी महाविद्यालयाच्या विद्यार्थिनी कु.अनुराधा पाटील, कु.मयुरी मदने, कु.रूपाली खराडे, कु.प्रिया अडागळे, कु.भक्ती गुंजाळ, कु.आकांक्षा गायकवाड, कु.ऋतिका गाडेकर यांनी केले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Don`t copy text!