गोतोंडी गावठाणात भर दुपारी लांडग्याचा हल्ला

अशोक घोडके यांजकडून…
गोतोंडी(वार्ताहर): येथे गावठाणात गुरुवार(दि 26) रोजी भर दुपारी 1 वाजण्याच्या सुमारास एका लांड्ग्याने शेळ्याच्या गोट्यात हल्ला चढविलीअसून या हल्ल्‌यात 3 ते 4 महिनेची 4 बोकड व 3 शेळ्या असे 7 करडे मृत्युमुखी पडले असून एक गंभीर जखमी झाले आहे. अचानक भर दुपारी गोतोंडी गावठाणात लांडग्याने हल्ला केल्याने ग्रामस्थांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.

यावेळी मिळालेल्या माहिती नुसार गोतोंडी गावठाणातील अनिल बाबु बिबे यांच्या घराजवळ असलेल्या गोट्यात गुरुवार(दि 26 )रोजी दुपारी एक वाजण्याच्या सुमारास लांडग्याने हल्ला केल्याने या हल्ल्‌यात 7 बोकड व शेळी जातीच्या 3 ते 4 महिन्याच्या करडांचा मृत्यू झाला आहे व 1 गंभीर जखमी झाले आहे.घटना समजताच गोतोंडी गावाचे सरपंच गुरुनाथ नलवडे व ग्रामपंचायत सदस्य किशोर कांबळे यांनी घटनास्थळी भेट देवून वन विभाग व पशुवैद्यकीय डॉक्टर यांना फोन करून घटनेची कल्पना दिली. पशुवैद्यकीय डॉ.साहेबराव शेगर यांनी घटनास्थळी भेट देवून तपासणी केली व 3 शेळ्या व 4 बोकड हल्लात मयत झाल्याचे सांगितले व एक गंभीर जखमी असून त्याच्या औषधउपचार केले.

यावेळी सरपंच गुरुनाथ नलवडे यांनी बोलताना सांगितले कि गोतोंडी गावाजवळ दोन्ही बाजूला वन क्षेत्र मोठे असून या वनात विविध प्राणी आहेत. यामुळे वन विभागाने वन्यप्राण्यापासुन शेळ्या मेंढ्या चा व लोकांचे तसेच लहान मुलांचे संरक्षण होईल असे ठोस उपाययोजना करावेत व शासन स्तरावरून अनिल बिबे या शेतकर्‍यांस नुकसान भरपाई त्वरित देण्यात यावी अशी मागणी देखील सरपंच गुरुनाथ नलवडे यांनी केली आहे. यावेळी राजाराम राऊत,सतीश काशीद,युवराज पवार,प्रकाश मोरे उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Don`t copy text!