भारत बंदला इंदापूरकरांकडून उत्स्फूर्त प्रतिसाद

अशोक घोडके यांजकडून…
इंदापूर(वार्ताहर): ओबीसी जातीनिहाय जनगणना, ईव्हीएम मशीन,महागाई, बेरोजगारी अशा विविध विषयांना अनुसरून राष्ट्रीय ओबीसी मोर्चाने पुकारलेल्या ’भारत बंद’ला इंदापूरकरांनी कडकडीत बंद करून उत्स्फूर्त प्रतिसाद दिला.

इंदापूर सह तालुक्यातील, बावडा, निमगाव केतकी,गोतोंडी,शेळगाव,अंथुर्णे,जंक्शन,लासुर्णे,वडापुरी, सुरवड, शहा, रुई, बिजवडी, अंथुर्णे या ठिकाणी अत्यावश्यक सेवा वगळता कडकडीत बंद करण्यात आला तर इतर ठिकाणी संमिश्र प्रतिसाद मिळाला.

राष्ट्रीय ओबीसी मोर्चाने ओबीसींची जातीनिहाय जनगणना न करने , जुनी पेन्शन योजना सुरु करावी, ईव्हीएमचा वापर मतदानासाठी होऊ नये, खाजगी क्षेत्रात एससी, एसटी, ओबीसींना आरक्षण लागू करावे, नवीन कामगार कायदा रद्द करावा व सीएए, एनआरसी सारखे अन्यायकारक कायदे मागे घेण्यात यावे, शिक्षण क्षेत्रातील खाजगीकरण बंद करावे, महानगर पालिकेतील कंत्राटी कामगारांना कायम करावे तसेच राज्य परिवहन महामंडळाचे खाजगीकरण थांबवावे, जीवनावश्यक वस्तूंसह वाढत असलेले इंधनाचे दर कमी करावे या व अन्य मागण्यांसाठी भारत बंद पुकारला होता.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Don`t copy text!