अशोक घोडके यांजकडून…
इंदापूर(वार्ताहर): भारतीय जनता पक्ष कार्यकारिणी समितीची बैठक मुंबई येथे झाली. यावेळी माजी मंत्री हर्षवर्धन पाटील सहभागी झाले. यावेळी विरोधी पक्षनेते माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणीस, महाराष्ट्राचे प्रभारी सी.टी. रवी, तसेच भारतीय जनता पार्टीचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी व्हर्च्युअल स्वरूपात सहभागी होऊन मार्गदर्शन केले.
ओबीसी आरक्षण जाणे हे या सरकारचं पाप आहे. त्यांच्या मनात पाप होतं म्हणून ओबीसी आरक्षण यांनी घालवलं, असं म्हणत विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी ठाकरे सरकारवर टिकास्त्र सोडलं. तसेच, ओबीसी हा भाजपचा डीएनए आहे, ओबीसी आरक्षणासाठी ठाकरे सरकारविरोधात लढा तीव्र करणार, असा एल्गार देवेंद्र फडणवीसांनी यावेळी केला.