अशोक घोडके यांजकडून…
इंदापूर (वार्ताहर): गोतोंडी परिसरातील शेतकरी बांधवांच्या हितासाठी जलसंधारण विभागातून तब्बल 1कोटी 64 लाख 96 हजार रूपयांचे सिमेंट बंधारे मंजूर केल्याबद्दल गोतोंडी ग्रामस्थांच्या वतीने नामदार दत्तात्रय भरणे यांचा पेढा भरवून शाल व फेटा देऊन जाहिर सत्कार केला.
याप्रसंगी गोतोंडीचे सरपंच गुरुनाथ भागवत नलवडे, उपसरपंच परशुराम तुकाराम जाधव, मा. सोसायटी चेअरमन यशवंत श्रीकृष्ण पाटील, सदस्य किशोर अंकुश कांबळे, छगन दादाराम शेंडे,संतोष दतात्रय मारकड, शंकर नामदेव भोंग, पत्रकार अशोक निवृती घोडके, अजिनाथ महादेव नलवडे ,बापुराव बबन पिसे यांच्यासह ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.