अशोक घोडके यांजकडून…
इंदापूर(वार्ताहर): पुणे जिल्ह्याचे जिल्हाधिकारी डॉ.राजेश देशमुख यांचा वाढदिवस इंदापूर येथे उपविभागीय अधिकारी दादासाहेब कांबळे व इंदापूरचे कर्तव्यदक्ष तहसिलदार श्रीकांत पाटील यांच्या हस्ते केक कापून वाढदिवस साजरा करण्यात आला.
पुणे ग्रामीणचे पोलीस अधिक्षक डॉ.अभिनव देशमुख, उपविभागीय पोलीस अधिकारी गणेश इंगळे व इंदापूरचे तहसिलदार श्रीकांत पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली इंदापूरचे सामाजिक कार्यकर्ते यांनी अधिकार्यावर असलेल्या निष्ठा व प्रेमापायी डॉ.राजेश देशमुख यांचा वाढदिवस साजरा करण्याचे आयोजन केले होते.
यावेळी उपविभागीय पोलीस अधिकारी गणेश इंगळे यांच्या शुभहस्ते तहसिल, नगरपरिषद, आरोग्यविभाग, शेतकी विभागातील कर्मचार्यांना ड्रायफ्रुटचे वाटप करण्यात आले.
यावेळी गणेश इंगळे, श्रीकांत पाटील व दादासाहेब कांबळे यांनी जिल्हाधिकारी डॉ.राजेश देशमुख यांनी केलेल्या कामाचे कौतुक करून त्यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या.
कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी नायब तहसीलदार अनिल ठोंबरे, महेश माने, विशाल बनसोडे, ललित होले, महेश लंबाते व विजय बनसोडे व श्रीकांत वाडकर तसेच विविध क्षेत्रातील कर्मचारी उपस्थित होते.