बारामती(वार्ताहर): अखिल तांदुळवाडी वेस तरुण मंडळाचे जेष्ठ सभासद विष्णू दिनकर हिंगणे उर्फ आबा हे वयाच्या 90 व्या वर्षात तरूणांना लाजवेल अशी दररोज 10 कि.मी. सायकल फिरवतात.
आबांची प्रकृती अतिशय ठणठणीत आहे. भारदस्त शरीर, पहाडी आवाजाने त्यांची वेगळी ओळख आहे. ग्रामदैवत हजरत चॉंदशाहवली दर्ग्याचे ते मानकरी आहेत. बाबांचा निघणारा झेंडा पकडण्याचा मान त्यांचा आहे. आबांनी लहानपणापासूनच कष्ट करून जीवन व्यथित केले. तीस वर्ष बाजार समितीतून बैलगाडीत धान्याची पोती वाहन्याचे काम केले. आबांचा सायकलचा प्रवास म्हणजे सध्याच्या तरूण पिढीसमोर एक आदर्श निर्माण करणारा आहे.