बारामती(वार्ताहर): उपविभागीय पोलीस अधिकारी गणेश इंगळे यांच्या नेतृत्वाखाली सुरू असलेल्या निर्भया पथकाकडे नागरीकांनी निर्भिडपणे तक्रार करा असे आवाहन बारामती शहर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक सुनिल महाडिक यांनी केले आहे.
गणेश मार्केट भागात दारू पिऊन उभे असणार्या महिलांच्यावर कारवाई प्रसंगी श्री.महाडिक यांनी सांगितले.
गणेश मार्केट परिसरामध्ये अनेक महिला दारू पिऊन कायदा व सुव्यवस्थेचा भंग करीत असतात. तसेच अवैध व्यवसाय सुद्धा करीत असतात. तीन महिन्यापूर्वी त्याठिकाणी छापा मारून पोलिसांनी अनैतिक मानवी व्यापार अधिनियमाप्रमाणे चार महिलांना अटक केली होती. त्यानंतर असे प्रकार बंद झाले होते. मात्र पुन्हा या महिलांचा त्रास सुरू झाल्याने स्थानिक व्यापारी व नामांकित पत्रकारांच्या तक्रारी आल्या होत्या. शनिवार दि.7 मे रोजी मंत्री महोदयाचा दौरा झालेनंतर पोलीस गाफील असतील अशा भावात त्या ठिकाणी सायंकाळी सात वाजण्याच्या सुमारास दोन महिला दारू पिऊन रस्त्यावर आरडाओरडा करत होत्या त्यावेळेस तात्काळ पो.नि.सुनील महाडिक, पो.ह.सचिन वाघ, महिला पो.क.काजडे, जमदाडे, पो.ना.जाधव, पो.ह.यशवंत पवार, दशरथ कोळेकर यांच्या टीमने पायी मार्केट भागात गस्त केली सदर महिला यांना शोधून पोलीस ठाण्यात आणण्यात आले.
सदर महिलांनी दारू पिलेले होते सदर महिलांची तात्काळ वैद्यकीय तपासणी करून त्यांच्यावर महाराष्ट्र पोलीस अधिनियम कलम 110 117 प्रमाणे कारवाई करण्यात आलेली आहे.
यापुढे महिला अवैध दारू धंदा किंवा अवैध मानवी व्यापार करत असतील तर त्यासाठी महिला पो.ह.पवार, गलांडे, जमदाडे, धुमाळ, साबळे यांचे पथक तयार करण्यात आलेले आहे व त्यांच्यावर यापुढे सतत कारवाई होणार आहे.