खाजगी सावकारांच्या जाचाला कंटाळून आरोग्य मित्राने इतर राज्यात केले पलायन

बारामती(वार्ताहर): येथील आरोग्य मित्र कृष्णा जेवाडे खाजगी सावकारांच्या जाचाला कंटाळून त्यांनी इतर राज्यात काही दिवसांसाठी पलायन केले असल्याचे कृष्णा जेवाडे यांनी आमच्या प्रतिनिधीशी बोलताना व्यक्त केले.

जेवाडे यांनी सांगितले की, मी कोणाचाही एकही रूपया बुडविणार नाही, मात्र खाजगी सावकारांनी माझी जी बदनामी सुरू केली आहे त्यामुळे माझ्या व्यवसायावर त्याचा विपरीत परिणाम होणार आहे. काही महिन्यात येथील काम झालेवर सगळ्यांचे पैसे देणार असल्याचेही त्यांनी सांगितले आहे.

बेकायदेशीर सावकारीला लगाम बसण्यासाठी शासनाने नव्या सावकारी अधिनियमात विनापरवाना सावकारी करणार्‍यास पाच वर्षांपर्यंतच्या कैदेची शिक्षा किंवा पन्नास हजार रूपयांपर्यंत दंडाची तरतूद केली आहे. तरी सुद्धा राजरोसपणे काही सावकार आडदांड वृत्तीने व कायद्याचे उल्लंघन करीत दमदाटी करीत आहेत.

शासन जेवढे कायदे कडक करेल तेवढे पळवाटा संबंधित कायद्याचे पालन न करणारे शोधून काढीत असतात. सावकार वचनचिठ्ठी किंवा इतर प्रकारचीकागदपत्रे न घेता थेट कर्जदाराच्या नावावर असणारे घर, क्षेत्र किंवा वस्तुंचे थेट खरेदीखत करतात आणि त्या जोडीला कर्जदाराने व्याजासह पैसे दिल्यानंतर खरेदीखत उलटून देण्यासाठी करारनामा, प्रतिज्ञापत्र नोंदवतात.

सावकारांना चांगले माहिती आहे की, वचनचिठ्ठी किंवा इतर कागदपत्रे घेतल्याचे निदर्शनास आल्यास तीन वर्षापर्यंत कैद किंवा पंचवीस हजार रूपये दंडाची तरतूद आहे.

जेवाडे यांच्या प्रकरणात काही सावकारांनी तर त्यांच्या ताब्यातील, खरेदी केलेल्या वस्तु म्हणजे कॉम्प्युटर, मोबाईल सारख्या महागड्या वस्तु घेऊन गेले आहेत. या महाभाग सावकारांना कुठे माहिती की, ज्या वस्तु उचलून नेले त्या वस्तुच्या खरेदी पावत्या कृष्णा जेवाडे यांच्या आहेत.

कित्येक वेळा कर्जदार गरज सरो वैद्य मरो अशा वृत्तीप्रमाणे वागतात. ज्यावेळी गरज असते त्यावेळी खाजगी सावकार, कायदा याबाबत त्यांच्या डोळ्यावर पडदा येतो. गरज संपली की, गरज करणार्‍याला कशाप्रकारे अडचणीत आणून स्वत:चा स्वार्थ साधता येईल असेही काही कर्जदार असतात. मात्र, कृष्णा जेवाडे यास अपवाद आहे. एवढं होऊनही सगळ्यांचे पैसे देण्याची त्यांची तयारी आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Don`t copy text!