कितीही राजकीय वादळे आली तरी, वसंतनगरकर पवार कुटुंबियांच्या पाठीशीच -किरणदादा गुजर

बारामती(वार्ताहर): कितीही राजकीय वादळे आली तरी वसंतनगर नागरीक पवार कुटुंबियांच्या पाठीशी खंबीरपणे उभे असतात असे प्रतिपादन बारामती नगरपरिषदेचे मा.ज्येष्ठ नगरसेवक किरण गुजर यांनी केले.

थॅलेसिमिया दिनानिमित्त वसंतनगर येथे महेश भाऊ गायकवाड मित्र परिवाराच्या वतीने भव्य रक्तदान शिबिराच्या उद्‌घाटन प्रसंगी श्री.गुजर बोलत होते. शिबीरा दरम्यान बारामती टेक्सटाईल पार्कच्या अध्यक्षा सौ.सुनेत्रावहिनी पवार यांनी भेट दिली व शिबीराचे कौतुक केले.

यावेळी राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाचे बारामती शहर अध्यक्ष इम्तियाज शिकीलकर, महिला शहराध्यक्षा सौ.अनिता गायकवाड, मा.नगरसेविका सौ.सविता जाधव, सौ.अर्चना जाधव, शिक्षण विस्तार अधिकारी संजय जाधव, शासकीय दक्षता समितीचे अध्यक्ष ऍड.अविनाश गायकवाड, सयाजी गायकवाड, उत्तम धोत्रे, पत्रकार तैनुर शेख इ. मान्यवर उपस्थित होते.

पुढे श्री.गुजर म्हणाले की, मिशन हायस्कुलच्या माध्यमातून माझा व येथील रहिवाश्यांचा जुना ऋणानुबंध आहे तो टिकविण्याचा प्रयत्न केला आहे. मात्र, अलीकडच्या पिढीने तसा संपर्क येत नाही. वसंतनगर येथील कित्येक शिक्षक हे नगरपालिका, जि.प. व इतर ठिकाणी काम करतात त्यामुळे या लोकांचा पक्षाला व सहकार्यांना पुरक आहे. कोंडीबा गायकवाड या कुटुंबांचे वसंतनगरच्या जडण घडणीमध्ये मोलाचे योगदान असल्याचेही त्यांनी सांगितले.

थॅलेसिमिया हा एक असा आजार आहे जो लहान मुलांना जन्मताच झालेला असतो. त्याची लक्षणे तीन महिन्यात दिसून येतात. रक्त उपलब्ध झाले नाही तर लहान मुलांचे जीवन धोक्यात येते. या आजाराचे गांभीर्य लक्षात घेऊन महेश भाऊ गायकवाड मित्र परिवाराच्या वतीने वसंतनगर येथे रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले. या शिबिरामध्ये उद्दिष्ट पेक्षा जास्त रक्त बाटल्यांचे संकलन झाले. महेश गायकवाड यांच्यावर विश्वास असणार्‍या युवकांनी विशेषत: महिलांनी या शिबिरात सहभाग नोंदविला.

या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन महेंद्र गायकवाड यांनी केले. आलेल्या मान्यवरांचे आभार महेश गायकवाड यांनी मानले. हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी युवकांनी विशेष परिश्रम घेतले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Don`t copy text!