प्रवासात मौल्यवान वस्तु सांभाळण्याचे बारामती शहर पोलीसांकडून आवाहन

बारामती(वार्ताहर): प्रवास करताना आपल्या मौल्यवान वस्तु आपआपल्या जबाबदारीवर सांभाळण्याचे आवाहन बारामती शहर पोलीस स्टेशनच्या वतीने करण्यात आले आहे.

बारामती बस स्थानकामध्ये महिला नामे कलावती पांडुरंग माने (वय-45 रा.पाहुणेवाडी, ता. बारामती) या दुपारी एस.टी.ने नीरा येथे जात असताना बारामती एस. टी.स्टँडवर एस.टी.मध्ये चढताना गर्दीचा फायदा घेऊन अज्ञात महिला चोरट्याने 12 ग्रॅम वजनाचे मंगळसूत्र चोरून नेले म्हणून गुन्हा दाखल केला आहे. तपास पोलिस हवालदार शिंदे करत आहेत.

तरी आता एस टी पूर्ण क्षमतेने सुरू झाली आहे. तरी प्रवास करताना महिलांनी दागिने व पर्स सांभाळावे असेही आवाहन करण्यात आले आहे. संशयित इसम दिसल्यास बारामती शहर पोलीस स्टेशन 02112-224333 वर संपर्क साधावा.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Don`t copy text!