असभ्य गैर वर्तन करुन धक्का-बुक्की केलेबाबत संबंधीत पोलीस अधिकारी व कर्मचार्‍यावर ऍट्रॉसिटी ऍक्टनुसार कारवाई करण्याची मागणी

बारामती(वार्ताहर): सामाजिक कार्यकर्ते व बारामती तालुका दूध उत्पादक संघाचे संचालक अरविंद गायकवाड (रा.मोरगांव, ता.बारामती) यांचेसोबत वडगांव निंबाळकर पोलीस स्टेशनचे पोलीस उपनिरीक्षक सलीम शेख व इतर कर्मचार्‍यांनी असभ्य गैरवर्तन करून धक्का बुक्की केलेबाबत ऍट्रॉसिटी ऍक्टनुसार गुन्हा दाखल करण्याची मागणी करण्यात आली आहे.

दि.14 एप्रिल 2022 रोजी भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या मिरवणुकीमध्ये सदरचा प्रकार घडला.

अनुसुचीत जाती जमाती कायदयाअंतर्गत गुन्हा नोंदवुन कार्यवाही करणेच्या मागणी संदर्भात अतिरीक्त पोलीस अधिक्षक सो मिलींद मोहीते यांची भेट घेऊन तक्रारी अर्ज दाखल करण्यात आला.

अरविंद गायकवाड हे बौध्द समाजाचे आहेत. बारामती तालुक्यामध्ये प्रतिष्ठीत व्यक्ती म्हणुन त्यांना ओळखले जाते अशी सर्व परिस्थीती असताना त्यांचे सोबत घडलेला प्रकार हा निंदनीय व निषेद करणारा आहे. यावेळी पुणे येथील दलित कोबराचे ऍड.विवेकभाई चव्हाण, माजी उपनगराध्यक्ष भारतदादा अहिवळे, मनसे पुणे जिल्हाध्यक्ष ऍड. विनोद जावळे, विजय(डॅडी) सोनवणे, मोरगावचे सरपंच निलेश केदारी, माजी सरपंच दत्तात्रय ढोले, निरा मार्केट कमीटीचे संचालक बबन तावरे, माजी उपसभापती दत्तात्रय लोंढे, अरविंद बगाडे, धनंजय तावरे, विजय भिसे, ऍड.सुशिल अहिवळे इ.उपस्थीत होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Don`t copy text!