बारामती(वार्ताहर): सामाजिक क्षेत्रात उल्लेखनिय कार्य करणारे शरयु फौंडेशनच्या वतीने 25 एप्रिल 2022 रोजी फौंडेशनच्या अध्यक्षा सौ.शर्मिला पवार यांच्या उपस्थितीत कन्हेरी वनपरिक्षेत्र येथे वन्यप्राण्यांसाठी टँकरद्वारे पाणी सोडण्यात आले.
दरवर्षी शरयु फौंडेशनच्या वतीने वन्यप्राण्यांना पाण्यासाठी भटकंती करावी लागू नये, यासाठी वन क्षेत्रासह अन्यत्रही आवश्यकेतनुसार पाण्याची व्यवस्था करण्यात येते. वन्यप्राण्यांसाठी वन क्षेत्रात ठिकठिकाणी तयार करण्यात आलेल्या पाणवठ्यात आवश्यकते नुसार टँकरद्वारे पाणी पुरवठा केला जात असल्याची माहिती शर्मिला पवार यांनी यावेळी देत पाण्यासाठी भटकंती करण्याची वेळ येणार नाही, असे नियोजन केल्याचे नमूद केले. यावेळी शरयु फौंडेशनचे पदाधिकारी व ग्रामस्थ उपस्थित होते.