नगरपरिषदेच्या हद्दीत काही ठिकाणी पाणी पुरवठा बंद

बारामती(वार्ताहर): बारामती नगरपरिषद हद्दीतील भिगवण रोड तीन हत्ती चौका लगतच्या नीरा डावा कालवा पुलावरील पाणी पुरवठ्याच्या दाब नलिका, वितरण नलिका नवीन पुलावरून स्थानांतरीत करणेचे काम करण्यात येणार असल्याने काही ठिकाणी पाणी पुरवठा बंद राहणार असल्याचे मुख्याधिकारी महेश रोकडे यांनी एका पत्रकाद्वारे कळविले आहे.

सदरच्या पाईप लाईन्स पूर्ववत जोडणेचे काम करण्यासाठी बराच वेळ लागणार असल्याने दरम्यान, सिद्धार्थनगर, भीमनगर, चंद्रमणीनगर, विठ्ठलनगर, कोअर हाऊस, वडार सोसायट्या, वडकेनगर, सटवाजीनगर इ. संपूर्ण आमराई विभागात गुरूवार दि.28 एप्रिल 2022 रोजी पाणी पुरवठा बंद राहील.

विजयनगर, पोस्ट रोड, जवाहरनगर, सिनेमारोड, महावीर पथ, बुरूडगल्ली, नेवसे रोड, सिद्धेश्र्वर गल्ली, कसबागल्ली, सनगर गल्ली, श्रीरामगल्ली या भागातील पाणी पुरवठा शुक्रवार दि.29 एप्रिल 2022 रोजी बंद राहील.

तरी संबंधित भागातील नागरीकांनी याची नोंद घेऊन पुरेसा पाणी साठा करून पाणी काटकसरीने वापरून नगरपरिषदेस सहकार्य करावे असेही विनंती करण्यात आली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Don`t copy text!