स्वत:बरोबर गोर-गरीबांची ईद साजरी होण्यासाठी मोफत शिर्रर्खुमा पदार्थांचे वाटप : आलताफ सय्यद यांचा गेली 14 वर्ष अखंडित स्तुत्य उपक्रम, राज्याचे उपमुख्यमंत्री ना.अजितदादा पवारांनी केले कौतुक!

बारामती(वार्ताहर): स्वत:चे व स्वत:च्या कुटुंबाचे स्वप्न, आशा, आकांक्षा पूर्ण करण्याची इच्छा तर प्रत्येकाचीच असते. तसे ते चांगलेही आहे पण अशा फारच थोड्या व्यक्ती असतात ज्या गरीब, कष्टकरी, दु:खी, पिडीत , गरजु आणि निराधारांसाठी आपल्या आनंदात त्यांना सामावून घेण्यासाठी आपल्या आयुष्याचं ध्येय बनवतात.

असेच बारामती येथील मुस्लिम बँकेचे संचालक व राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाचे निष्ठावंत कार्यकर्ते आलताफ सय्यद, बा.न.प.शिक्षण मंडळाचे माजी सभापती कमरूद्दीन सय्यद व सहारा फौंडेशनचे संस्थापक अध्यक्ष परवेज सय्यद व मित्र परिवार हे गेली 14 वर्ष अखंडित गरीब, कष्टकरी, दु:खी, पिडीत, गरजु व निराधार 300 कुटुंबांना रमजान ईदनिमित्त शीरखुर्मा बनवण्यासाठी लागणार्‍या पदार्थांचे मोफत वाटप करीत आले आहे. यंदाचे 15 वे वर्ष आहे. दरवर्षी या आनंदात आणखीन आनंद द्विगुणीत करणारे राज्याचे उपमुख्यमंत्री ना.अजितदादा पवार हे प्रत्येकी कुटुंबाला 4 लिटर दूध देणेची सूचना बारामती दूध उत्पादक संघाला करीत असतात.

27 एप्रिल 2022 रोजी राज्याचे उपमुख्यमंत्री ना. अजितदादा पवार यांची समक्ष मुंबई येथील त्यांच्या निवासस्थानी भेट घेऊन बारामती तालुक्यातील 300 कुटुंबांना शीरखुर्मा बनवण्यासाठी लागणार्‍या पदार्थांचे मोफत वाटपबाबत माहिती दिली. दादांनी सर्व पदार्थांची माहिती घेऊन पाहणी केली.

ना.अजितदादा पवार, दूध संघाचे चेअरमन सर्व संचालक मंडळ व कार्यकारी संचालक यांचे ते देखील मागील दहा वर्षापासून न चुकता 1200 लिटर दूध पुरवठा करीत आहेत यांचे आलताफ सय्यद यांनी आभार व्यक्त केले. यावेळी बा.न.प.शिक्षण मंडळाचे माजी सभापती कमरूद्दीन सय्यद व सहारा फौंडेशनचे संस्थापक अध्यक्ष परवेज सय्यद उपस्थित होते.

मोहम्मद पैगंबर (स.) यांनी लोकांना ईदच्या नमाजला जाण्यापूर्वी जकात-अल फित्र देण्याचे आदेश दिले. गरीब, गरजु, दु:खी, पिडीतांचा हक्क आहे. हे देताना प्रथमत: आपल्या कुटुंबातील, पै-पाहुण्यातील व्यक्ती कोणी गरीब आहे का? हे पाहणे गरजेचे आहे. असे कोणी नसेल तर मदरसा किंवा अनाथांचा त्यावर हक्क असतो. याला अनुसरूनच आलताफ सय्यद काम करीत आलेले आहेत. हे वाचल्यानंतर काही मंडळी म्हणतील आणखीन खूप काही इस्लाममध्ये सांगितले आहे. मात्र, प्रथमत: स्वत: आरशात पाहुन विचारा की, मी किती इस्लामच्या अर्टी व शर्तीचे तंतोतंत पालन करतो?

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Don`t copy text!