इंदापूर शहराच्या विकास कामांत आणखीन भर : 5 कोटींचा निधी मंजूर, राज्यमंत्री दत्तात्रय भरणे यांची माहिती

अशोक घोडके यांजकडून…
इंदापूर(वार्ताहर): इंदापूर तालुक्याचा सर्वांगीण विकास करण्याचा ध्यास राज्यमंत्री दत्तात्रय भरणे यांनी घेतला आहे. इंदापूर शहराच्या विकास कामांत आणखीन भर टाकून 5 कोटींचा निधी मंजूर केला असल्याचे राज्यमंत्री दत्तात्रय भरणे यांनी माहिती दिली. ’वैशिष्ट्‌यपूर्ण’ योजनेअंतर्गत तसेच विशेष रस्ता अनुदान निधीतून इंदापूर शहरातील विविध विकास कामांकरिता 5 कोटी रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला आहे.

इंदापूर शहाराकरिता सन 2021-22 करीता लेखाशीर्ष (30540022) खालीलप्रमाणे कामे करण्यात येणार आहे.
इंदापूर शहरातील गणेश कोथमीरे घर ते बागवान गल्ली भिसे घर ड्रेनेज व कॉंक्रिटीकरणासाठी 70 लाख रुपये.
शाहू नगर येथे अंतर्गत ड्रेनेज व कॉंक्रिटीकरण 50 लाख
राजेवली नगर येथे ड्रेनेज करणे 30 लाख
श्रीनाथ हौसिंग सोसायटी व वडरगल्ली अंडरग्राउंड ड्रेनेज व लादीकरण करणे 30 लाख
अशोक क्लॉथ स्टोअर्स ते आगलावे घर पंधारानाला पर्यंत व सिद्धेश्वर बोळ ड्रेनेज व कॉंक्रिटीकरण करणे 25 लाख
रामवेस नाका सुशोभीकरण करणे व श्रीराम मंदिर परिसरात कॉंक्रिटीकरण करणे 30 लाख
कासारपट्टा परिसर अंतर्गत ड्रेनेज व कॉंक्रिटीकरण 25 लाख
कोठारे घर ते श्रीकृष्ण मंदिर ते बेपारी गल्ली अंतर्गत ड्रेनेज व डांबरीकरण रस्ता 25 लाख
डॉ. बाबासाहेब आंबेडकर सोसायटी येथे रामचंद्र मखरे घर ते विलास मखरे घर रस्ता करणे 10 लाख
महंतीनगर मध्ये शिंदे घर ते कॅनॉलपर्यंत रस्ता करणे 10 लाख
डॉ.बाबासाहेब आंबेडकर सोसायटी मध्ये विलास मखरे घर पाथवे व लादीकरण करणे 10 लाख
इंदापूर शहरातील सोलापूर रोड ते पाण्याच्या टाकीपर्यंत डांबरी रस्ता करणे 10 लाख
ज्योतिबा मंदिर येथे लादीकरण 15 लाख
दत्तनगर येथे भूमिगत गटार करणे 15 लाख
विठ्ठल होंडा ते ढोले फर्निचर मॉल पर्यंत रस्ता करणे 25 लाख
गवळी गल्ली ते कारखाना रोड रस्ता करणे 15 लाख
साळूंखे मळा ते खंडोबा मंदिर रस्ता करणे 15 लाख
तसेच सन 2021-22 लेखाशीर्ष (22171301) खालीलप्रमाणे कामे करण्यात येणार आहे.
शहरातील संत सेना महाराज सामाजिक सभागृह ( महात्मा फुले शॉपिंग सेंटर मागे) वॉलकम्पाउंड व सुशोभीकरण करणे 30 लाख
शहीद भगतसिंग चौक येथील नगरपरिषद जागेमध्ये 2 मजली सभागृह बांधणे 25 लाख
प्रभाग क्र.8 बारामती रोड चौक सुशोभीकरण व शिल्प बसवणे 20 लाख
संत सेना महाराज वाचनालय व संत रोहिदास मंदिरासमोर हायमास्ट बसविणे 15 लाख
प्रभाग क्र.1 मधील महात्मा फुले नगर मध्ये सभामंडप करणे 15 लाख
मंहती नगर येथे सभामंडप व सुशोभीकरणासाठी 15 लाख
इ. कामांकरिता एकूण 5 कोटी रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला असून विकास कामांच्या माध्यमातून येणार्‍या काही दिवसात इंदापूर शहराची एक वेगळी ओळख निर्माण करणार असल्याची ग्वाही राज्यमंत्री भरणे यांनी दिली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Don`t copy text!