अशोक घोडके यांजकडून….
इंदापूर(प्रतिनिधी): अवध्या तालुक्याचे लक्ष लागून असलेल्या इंदापूर तालुका प्राथमिक शिक्षक सहकारी पतसंस्थेचा पंचवार्षिक निवडणूक निकाल हाती आला आहे. गेली पंधरा वर्ष या पतसंस्थेवर भाजपा नेते व माजी मंत्री हर्षवर्धन पाटील यांच्या विचाराच्या गटाची सत्ता होती. मात्र राज्यमंत्री दत्तात्रय भरणे याच्या मार्गदर्शनाखाली स्वाभिमानी शिक्षक परिवर्तन पॅनलने ही पंधरा वर्षांची असणारी सत्ता उधळून लावली आहे. हाती आलेल्या निकालात स्वाभिमानी शिक्षक परिवर्तन पॅनलने 29 पैकी 21 जागावर निर्विवाद सत्ता मिळवली आली. त्यामुळे होऊ घातलेल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या दृष्टीने हर्षवर्धन पाटील यांसाठी हा मोठा धक्का मानला जात आहे.
दरम्यान राज्यमंत्री दत्तात्रय भरणे यांनी सर्व विजयी उमेदवारांचे अभिनंदन केले असून सर्व मतदार शिक्षक वर्गाचे आभार मानले आहेत. निकाल हाती येताच स्वाभिमानी शिक्षक परिवर्तन पॅनलने फटाक्यांची आतिशबाजी गुलालाची उधळण करीत एकमेकांना पेढे भरवून जल्लीष साजरा केला.इंदापूर तालुका प्राथमिक शिक्षकांची सहकारी पतसंस्था मर्या इंदापूर या संस्थेची 2021/22 ते 2025/26 या कालावधी करीता पंचवार्षिक निवडणूक कार्यक्रम जाहिर झाला होता, आज रविवारी दि.24 एप्रिल रोजी यासाठी मतदान प्रक्रिया पार पडली. त्यानंतर लगेच मतमोजनी करण्यात आली. यामध्ये शिक्षक विकास पॅनलचा दारुन पराभव झाला इंदापूर तालुका प्राथमिक शिक्षकांची सहकारी पतसंस्थालेवर स्वाभिमानी शिक्षक परिवर्तन पॅनल एकहाती सत्ता स्थापन करेल असा विश्वास पॅनल प्रमुख व तालुकाध्यक्ष नानासाहेब नरूटे यांनी व्यक्त केला होता. अखेर सत्ता आणन्यात स्वाभिमानी शिक्षक परिवर्तन पॅनलला यश आले आहे.
इंदापूर सर्वसाधारण मतदार संघातून दत्तात्रय अजिनाच ठोंबरे, शशिकांत किसन शेंडे, प्रशांत रामचंद्र घुले तर भिगवण लोणी देवकर सर्वसाधारण मतदार संघातून अनिल उत्तम शिंदे बालाजी श्रावण कलवले, सतिश विठ्ठल दराडे, भारत तात्याराम भांडे हे विजयी झाले आहेत. तर सणसर निमसाखर सर्वसाधारण मतदार संघातून अदीनाथ विठ्ठल धायगुडे, संतोष दादाराम गदादे सदाशिव सजन रणदिवे तर बावडा रेडणी मतदार संघातून संतोष तानाजीराव तरंगे, रामचंद्र बलभिम शिंदे, दत्तात्रय सदाशिव चव्हाण, निमगांव केतकी लासुर्णे मतदार संघातून संजय सोपान म्हस्के सतिश सावळाराम गावडे, भाऊसाहेब जगन्नाथ वनवे, महिला राखीव मतदार संघातून सौ. संगीता सुरेश पांढरे, संजीवनी उध्दव गरगडे, अनु. जाती / जमाती राखीव मतदार संघातून सुहास नामदेव मोरे भटक्या विमुक्त जाती जमाती राखीव मतदार संघातून सचिन भानुदास देवडे,इतर मागासवर्गीय राखीव मतदार संघ किशोर राजाराम वाघ यांनी विजय संपादन केला. अशी माहिती निवडणूक निर्णय अधिकारी सहाय्यक निबंधक सहकारी संस्था जिजाबा गावडे यांनी दिली.